म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न.
![]()
म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न.
शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” – व्ही.पी. सुलताने.
भुसावळ : म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी श्रद्धाभावाने अभिवादन कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सुलताने हे होते.
यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. सरला सावकारे, श्रीमती. शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, डी. के. भंगाळे, नाना पाटील, ज्योती शिरतुरे, प्रवीण चौधरी, पूनम देवकर, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री. व्ही. पी. सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची संधी न मिळूनही त्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्ता, जीवनानुभव आणि प्रभावी लेखनाच्या बळावर मराठी साहित्यात अजरामर स्थान मिळवले. त्यांनी समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या वेदना आपल्या साहित्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडल्या. ते पुढे म्हणाले, “विद्यार्थी मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर यश संपादन करता येते. शिक्षण, समानता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

