अनेकांचे सन्मान हे जनसहयोग संस्थेचे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम– संजय एम.देशमुख* , *देशभक्तीचा उत्साह; ‘मेरी जान तिरंगा’ कार्यक्रमात शहीदांना सुरश्रद्धांजली* *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार आणि महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्डने प्रतिभांचा गौरव* *लोकस्वातंत्र्य पदाधिकारी सौ.जया भारती यांचेसह अनेकांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार*
![]()
*अनेकांचे सन्मान हे जनसहयोग संस्थेचे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम– संजय एम.देशमुख*
*देशभक्तीचा उत्साह; ‘मेरी जान तिरंगा’ कार्यक्रमात शहीदांना सुरश्रद्धांजली*
*डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार आणि महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्डने प्रतिभांचा गौरव*
*लोकस्वातंत्र्य पदाधिकारी सौ.जया भारती यांचेसह अनेकांना एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार*
परभणी प्रतिनिधी
सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या ३१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील अग्रेसर व्यक्तिमत्त्वांचे सन्मान केले जात आहेत.हे उर्जादायी समारंभ म्हणजे सामाजिक विकासाची गती अधिक वाढवणारे सेवाभावी, उदात्त आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम आहेत. असे प्रतिपादन लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख (निंबेकर) यांनी केले.स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर शहीदांना सुरश्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ‘मेरी जान तिरंगा’ देशभक्तीपर भव्य गीत गायन कार्यक्रम,व “डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार” आणि “महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्ड” सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ते विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रभक्ती आणि शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशभक्तीपर गीतांच्या मनमोहक सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी तिरंगा आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतून आलेले मान्यवर,कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि प्रतिभावंत मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,कला तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील अग्रेसर प्रतिभावंतांना डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून उत्कृष्ट मेहंदी कलेचे प्रदर्शन करणाऱ्या प्रतिभावान मेहंदी कलाकारांना ‘महाराष्ट्र मेहंदी क्वीन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी सौ.जया भारती इंगोले (पत्रकार,महिला व्हिडिओ जॉकी व निवेदिका) यांना सुध्दा हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध जादूगार रितिक यांचे आकर्षक सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.जादूगार रितिक यांची शानदार जादूची प्रस्तुती करीत आपल्या अनोख्या आणि जादुई प्रयोगांनी उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मनोरंजनासोबतच अचानक राष्ट्रध्वज दाखवून देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेशही त्यांनी प्रभावीपणे दिला. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आला. देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेतील विजेते शेख जलील आणि अब्दुल रहमान कुरेशी आदींना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून शिक्षक आमदार विक्रम काळे (छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघ),संजय एम.देशमुख (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष– लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ),अध्यक्ष इंजि.आर.डी.मगर (राष्ट्रनिर्माण रत्न),उद्घाटक अब्दुल सत्तार इनामदार (काँग्रेस नेते,महाराष्ट्र),प्रमुख अतिथी म्हणून जलील पटेल (शिवसेना नेते, महाराष्ट्र),सय्यद गौस मोहियोद्दीन (प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर),डॉ.सालेहा कौसर (संचालक, कौसर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल),फराह नाज अंजुम (समाजसेविका,नांदेड), पुष्पराज गावंडे (राष्ट्रीय पदाधिकारी, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ),सौ.जया भारती इंगोले (राष्ट्रीय पदाधिकारी, लोकस्वातंत्र्य; महिला व्हिडिओ जॉकी/निवेदिका),लोकस्वातंत्र्य महाराष्ट्र संघटन प्रमुख,ज्येष्ठ पत्रकार भगिरथ बद्दर,बशीर अहमद (समाजभूषण), शिरीन बेगम मोहम्मद शफी (उपाध्यक्ष,वर्ल्ड ह्युमन राइट्स महाराष्ट्र),सादिया फातेमा (शिक्षिका, साहित्यकार),डॉ.जयदीप कोपरेकर,डॉ.आदित्य सोंडारे,शाहेद भैय्या सिद्दीकी,शेख मुजीब शेख मुनीर (उद्योजक जिंतूर),आशीष वानखडे-पाटील (लोकस्वातंत्र्य पदाधिकारी, व्यक्तिमत्त्व विकास व पत्रकार मार्गदर्शक),दिपाली बाहेकर (लोकस्वातंत्र्य पदाधिकारी, सूत्रसंचालिका),लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ),मनोहर मोहोड (जिल्हा सचिव,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ) आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.अरुण पडघन आणि हुसैन खान यांनी केले.तर आभार संयोजक तथा संस्थापक अध्यक्ष महेमूद खान यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करणे आणि नव्या पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले.उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाच्या भव्य आयोजनाचे आणि राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करून जनसहयोग सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह आयोजकांना शुभेच्छा दिल्या.





