अमळनेर समाजकार्य महाविद्यालयात संविधान जागर नाटिकेचे प्रभावी सादरीकरण
![]()
अमळनेर समाजकार्य महाविद्यालयात संविधान जागर नाटिकेचे प्रभावी सादरीकरण
अमळनेर प्रतिनिधी
संविधान जागर अभियान महाराष्ट्र अंतर्गत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अमळनेर संविधान जागर टीमने प्रभावीपने नाटिका सादर केली. स्त्रीशक्तीचा जागर, महिलाना संविधानाने काय हक्क व अधिकार दिले याचे प्रबोधन करण्यात आले. संविधान जागर टीमने प्रभावीपने नाटिका सादर केली, उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला.
अनिता संदानशिव , भारती कोळी, सुनीता मोरे, योगिता पांडे, निवेदिता कापडणे, रोहिणी शिरसाठ यांनी नाटिका सादर केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, डॉ अस्मिता सर्वैया, डॉ श्वेता वैद्य, डॉ अनिता खेडकर, विभाग प्रमुख जगदीश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर आणि उपस्थित मान्यवर यांनी स्त्रीशक्ती जागर टीमचे अभिनंदन करत प्रोत्साहन दिले.

