वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा*
![]()
*वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात साजरा*
दि. 11/02/26 वार बुधवार रोजी,
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पी. ई.तात्या पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, कॉलेज ऑफ नर्सिंग,कॉलेज ऑफ फिजिओथेरपी या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व “पांडुरंग प्रभा” वार्षिक मासिकाचे प्रकाशन सोहळा श्री. पी. ई. तात्या पाटील यांच्या 87 व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह येथे करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव शहराचे आमदार मा.श्री. राजू मामा भोळे,माजी.पालकमंत्री श्री. गुलाबराव आप्पासाहेब देवकर, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, सुप्रीम इंडस्ट्रीज,गाडेगावचे उपाध्यक्ष मा. श्री. सुरेशजी मंत्री,डॉ. सुरेश पाटील सर, मा.आदेश लालवणी चेयरमैन किड्स गुरुकुल-,मा.सुभाषजी साखला रेडक्रॉस जळगाव,नूतन मराठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मा.श्री. अजित वाघ सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्यापाटील, उपाध्यक्ष सौ. निर्मलाताई पाटील , सचिव मा. राहुल पाटील सर, ,मा. श्री. भूषण पाटील सर उपस्थित होते.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधांशु सिंग , फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. मनीषा टोनपे ,फार्मसी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. समिक्षा वारके ,नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या मनीषा बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच होमिओपॅथी, फार्मसी, नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेजचे सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नृत्य,नाटक, गीत-गायन,कविता वाचन, तसेच संगीत वाद्य वाजवून आपली कला सादर केली. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा या प्रसंगावर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
तसेच ,मा.श्री. राजू मामा भोळे, मा.श्री. गुलाबराव देवकर,मा.आदेश ललवानी,मा.सुरेशजी मंत्री,वाघ सर यांनी आपल्या भाषणातून तात्या-साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.पी. तात्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना तसेच सर्व डॉक्टर- प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

