सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा
1 min read

सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! , माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा

Loading

सीमेवरून सचिवालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!

माजी सैनिक राजेंद्र महाजन यांचे MPSC मध्ये तिहेरी यश; शासकीय सेवेत मानाचा टप्पा

अमळनेर प्रतिनिधी
कळमसरे, ता. अमळनेर, जि. जळगाव येथील मूळ रहिवासी व सध्या एरंडोल येथे वास्तव्यास असलेले श्री. राजेंद्र ईश्वर महाजन (माजी सैनिक, 25 मराठा लाईट इन्फंट्री) यांनी जिद्द, शिस्त आणि परिश्रमाच्या बळावर तिहेरी यश संपादन करत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
भारतीय सैन्यात तब्बल 15 वर्षे 3 महिने देशसेवा बजावून त्यांनी शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्त यांचे उदाहरण घालून दिले. देशसेवेची ही उज्ज्वल परंपरा पुढे नेत त्यांनी नागरी जीवनातही स्वतःला सिद्ध करत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून उल्लेखनीय यश मिळवले आहे.

🔹 MPSC 2024 – Tax Assistant
🔹 MPSC 2024 – Clerk
🔹 MAHAGENCO – Tech-3

या तिहेरी यशामुळे त्यांचे कर्तृत्व अधिकच अधोरेखित झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग (IGR Office), महाराष्ट्र शासन येथे पदभार स्वीकारून शासकीय सेवेत रुजू होत मानाचा टप्पा गाठला आहे.
कै. ईश्वर दयाराम महाजन यांचे सुपुत्र आणि कळमसरे येथील आदर्श शेतकरी श्री. भास्कर दयाराम महाजन यांचे पुतणे असलेल्या राजेंद्र महाजन यांच्या या यशामुळे संपूर्ण महाजन परिवाराचा मान उंचावला असून, कळमसरे व परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
सीमेवर देशाचे रक्षण करणारा सैनिक आणि त्यानंतर प्रशासनात कार्यरत राहून समाजसेवा करणारा अधिकारी — हा त्यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम, शिस्तबद्ध जीवनशैली आणि अपार जिद्द यांची जोड असेल तर यश नक्कीच मिळते, याचे ते जिवंत उदाहरण ठरले आहेत.
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळ, समाजबांधव, मित्रपरिवार व सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

( मराठी लाईव्ह न्युज वेबपोर्टल च्या माध्यमातून राजेंद्र चे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!💐)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *