_आव्हाने येथील विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न_*
![]()
*_आव्हाने येथील विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न_*
दि. ०९/०२/२६, वार सोमवार,रोजी. जि. प. मराठी मुलींची शाळा,आव्हाणे. येथील ४४ विद्यार्थिनींची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबर संपन्न झाले.यावेळी
जि.प.शाळा कुसुंबा येथील ४४ विद्यार्थ्यांना कॉलेजच्या बसने श्री. चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालय व श्री.पी. ई.तात्या पाटील रुग्णालय चिंचोली येथे आणण्यात आले. येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत होमिओपॅथी औषधी चे वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची पुढील काही दिवसात मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नेत्रदोष आढळतील त्या विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत मोफत चष्मा देण्यात येईल.
यावेळी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व इतर कर्मचारी यांची नेत्र तपासणी नेत्रचिकित्सक डॉ.जयेश वाल्हे यांनी केले. होमिओपॅथी तज्ञ डॉ. सुरेश अग्रवाल डॉ.अमिता श्रीवास्तव डॉ. सिद्धेश्वर पाटील, डॉ. सोनाली मोरे, नर्सिंग स्टाफ तसेच प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. श्री.राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक श्री. डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
तसेच शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांची, आणि जि. प.मराठी मुलांची शाळा आव्हाने, जि.प. उर्दू शाळा आव्हाने या शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आहे.
गट-शिक्षणाधिकारी,जळगाव मा. अजित तडवी साहेब यांनी जळगाव तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी नेत्र व आरोग्य तपासणी करून या उपक्रमात चा लाभ घेण्याचे आदेश तालुक्यातील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना दिले आहे. तसेच या संधीचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.

