पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप  विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव
1 min read

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव

Loading

पं. जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचा जल्लोषात समारोप

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध स्पर्धांमधून क्रीडागुणांना वाव

अमळनेर (प्रतिनिधी):
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रीडा विभागाच्या वतीने वार्षिक विविध क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच मैदानावर विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
स्पर्धांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पी. एस. पाटील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) चे प्राचार्य मा. विनोद वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील सहभागाचे महत्त्व पटवून देत, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघभावना यांचे महत्त्व अधोरेखित केले.

या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बुद्धिबळ, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, १०० मी., २०० मी. व ४०० मी. धावणे तसेच हॉलबॉल अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी जोमाने सहभाग नोंदवत आपली क्रीडाकौशल्ये सादर केली. विशेषतः धावण्याच्या स्पर्धा आणि क्रिकेट सामन्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. अभिजितभाऊ भांडारकर तसेच सर्व व्यवस्थापन मंडळाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी भविष्यातही अशाच उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा विश्वास व्यक्त केला.
या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडा संचालक डॉ. श्वेता वैद्य यांच्यासह डॉ. बी. डी. खंडागळे, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. अस्मिता सरवैये, डॉ. एस. आर. चव्हाण, मा. दिलीप कापडणीस सर, मा. शिरीष जाधव सर, मा. पाठक सर, डॉ. अनिता खेडकर, प्रा. डी. आर. ढगे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती, संघभावना आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या वार्षिक क्रीडा स्पर्धा महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या परंपरेला साजेशा ठरल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *