12 फेब्रुवारी 2026 रोजीचा देशव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हा परिषद समोरील धरणे आंदोलन यशस्वी करा.- रामकृष्ण बी.पाटील
1 min read

12 फेब्रुवारी 2026 रोजीचा देशव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हा परिषद समोरील धरणे आंदोलन यशस्वी करा.- रामकृष्ण बी.पाटील

Loading

 

12 फेब्रुवारी 2026 रोजीचा देशव्यापी लाक्षणिक संप आणि जिल्हा परिषद समोरील धरणे आंदोलन यशस्वी करा.- रामकृष्ण बी.पाटील

अमळनेर प्रतिनिधी
मध्यवर्ती सरकारने कामगार/ कर्मचारी हिताचे असलेले कायदे रद्द करून चार श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर श्रम संहिता ह्या कामगार/ कर्मचारी विरोधी असून त्या रद्द कराव्यात आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नमूद प्रलंबित मागण्या सोडवाव्यात.
यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या देशव्यापी लक्षणिक संपात सहभागी होण्याचा निर्णय समन्वय समिती घेतला आहे.
अशा आशयाचे निवेदन राज्याचे मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, मंत्री वित्त व नियोजन,मंत्री महिला व बालविकास यांच्यासह सचिव,महिला व बालविकास विभाग, आयुक्त,एबाविसे योजना,नवी मुंबई यांना देण्यात आले आहे.
*मागण्या*
1) केंद्र सरकारने आणलेले कामगार/कर्मचारी विरोधी कायदे रद्द करावेत.
2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतन व भत्ते लागू करावेत.
3) मा. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना ग्रॅच्युटी लागू करावी.
4) गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेविकांना 24800/- रुपये आणि मदतनीसांना 20400/- रुपये वेतन लागू करावे.
5) अंगणवाडी सेविका मदतनिसांना कामावर आधारित प्रोत्साहन भत्ता न देता तो मानधनात वर्ग करून सरसकट लागू करण्यात यावा.
6) योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रधान करून दरमहा पेन्शन लागू करण्यात यावे.
7) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने अदा करावा.
8) मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामासह अन्य योजनबाह्य कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नयेत.
9) अंगणवाडी सेविका मदतनीसांना दरवर्षी पंधरा दिवसांऐवजी एक महिना उन्हाळी सुट्टी देण्यात यावी.
10) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आजारपणाची भरपगारी रजा लागू करावी.
11) FRS करण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात याव्यात.
12) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकरच्या कामाचा विचार करून 5 जी मोबाईल देऊन दरवर्षी 3600 /- रुपये मोबाईल रिचार्जसाठी देण्यात यावेत.
या आणि अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी होणाऱ्या लाक्षणिक संपात राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीसांनी शंभर टक्के भागीदारी करून संपाच्या दिवशी अंगणवाडी केंद्राचे कोणतेही दैनंदिन काम न करता पोषण ट्रॅकर उघडू नये.
संपाच्या पार्श्वभूमीवर दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद जळगांव समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सदर धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सेविका मदतनीसांनी सकाळी 10.00 वाजता जिल्हा परिषद जळगांव येथे गणवेश परिधान करून सहभागी व्हावे असे आवाहन रामकृष्ण बी.पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रकल्प प्रमुख आणि बिट प्रमुखांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *