पत्रकारांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स* ’  ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवस चालणार उपक्रम*
1 min read

पत्रकारांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स* ’ ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवस चालणार उपक्रम*

Loading

*पत्रकारांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स*

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवस चालणार उपक्रम*

*श्री. श्री. रविशंकरसह राज्यातील मान्यवर संपादक, पदाधिकारी करणार मार्गदर्शन.*

प्रतिनिधी अनिल करंदकर

मुंबई /लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र या भूमिकेची जबाबदारी पार पाडताना आजच्या काळात पत्रकारांना प्रचंड मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. चोवीस तास बातम्यांचा पाठलाग, सततच्या डेडलाईन्स, विश्रांती शिवाय करावे लागणारे फील्ड वर्क, तसेच वैयक्तिक व कौटुंबिक जबाबदाऱ्यांची ओढाताण याचा थेट परिणाम पत्रकारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होताना दिसत आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम’ इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आणि ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा १० दिवसांचा विशेष ऑनलाईन मेडिटेशन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारांना मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अनुभव देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
सलग १० दिवस श्री. श्री. रविशंकर गुरुजीसह राज्यातील मान्यवर संपादक, पदाधिकारी करणार मार्गदर्शन करणार आहेत.
‘द आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सलील पुळेकर हे सर्व शेषन लीड करणार आहेत.
हा उपक्रम दि. २३ फेब्रुवारी २०२६ ते दि. ४ मार्च २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. या दहा दिवसांच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध नामवंत संपादक, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी, दि. २३ फेब्रुवारी रोजी महासागर मीडिया ग्रुपचे संपादक-संचालक श्रीकृष्ण चांडक प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होणार असून, व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर भूषवणार आहेत.
दि. २४ फेब्रुवारी रोजी लोकशाहीचे संपादक विशाल पाटील प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे राज्य उपाध्यक्ष अजित दादा कुंकूलोळ प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, राष्ट्रीय संघटक सारिका महोत्रा अध्यक्षस्थान भूषवतील.
दि. २५ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार व संपादक तुळशीदास भोईटे प्रमुख उद्घाटक असतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संचालक व मुख्य संयोजक गोरक्षनाथ मदने यांची प्रमुख उपस्थिती राहील, तर संचालक व्यंकटेश जोशी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. दि. २६ फेब्रुवारी रोजी पुढारी न्यूज टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे संचालक व संयोजक किशोर कारंजेकर प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी बँक समूहाच्या अध्यक्षा राजर्षी पाटील अध्यक्षपद भूषवतील.दि. २७ फेब्रुवारी रोजी एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक प्रमुख उद्घाटक असतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, उद्योजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राणा सूर्यवंशी कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.दि. २८ फेब्रुवारी रोजी लोकमतचे संपादक धर्मराज हल्लाळे प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम प्रदेश कार्याध्यक्ष नरेंद्र देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, उद्योजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैभव वानखडे अध्यक्षस्थान भूषवतील. दि. १ मार्च रोजी फ्री प्रेस जर्नल, नवशक्तीचे समूह राजकीय संपादक रविकिरण देशमुख प्रमुख उद्घाटक असतील. व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया प्रमुख उपस्थिती म्हणून सहभागी होतील, तर उद्योजक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा शेटे अध्यक्षपद भूषवतील. दि. २ मार्च रोजी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होतील. विभागीय अध्यक्ष संगम कोटलवार प्रमुख उपस्थिती राहणार असून, व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे आरोग्य विंग प्रमुख भीमेश मुतुला अध्यक्षस्थान भूषवतील. दि. ३ मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे प्रमुख उद्घाटक असतील. प्रदेश कार्याध्यक्ष कुमार कडलक प्रमुख उपस्थिती म्हणून लाभणार असून, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले अध्यक्षपद भूषवतील. कार्यक्रमाच्या समारोपाच्या दिवशी, दि. ४ मार्च रोजी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर प्रमुख उद्घाटक म्हणून सहभागी होतील. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे सर्व विंग प्रमुख अमोल मतकर मान्यवर उपस्थिती म्हणून लाभणार असून, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. सर्वाना सहभागीना प्रमाणपत्र मिळेल, सर्वाना खास बक्षीस दिले जाणार आहेत. ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा उपक्रम पत्रकारांसाठी केवळ ध्यानधारणेचा कार्यक्रम नसून, त्यांच्या मानसिक आरोग्याची जपणूक करणारा, तणावमुक्त व सकारात्मक पत्रकारितेकडे नेणारा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे मत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम कडून व्यक्त करण्यात आले आहे.
■ कार्यक्रमात सहभागी कसे व्हायचे?
‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ हा १० दिवसांचा ऑनलाईन मेडिटेशन उपक्रम पूर्णतः मोफत असून महाराष्ट्रातील तसेच देशातील सर्व पत्रकार, संपादक, माध्यम क्षेत्रातील कर्मचारी आणि मीडिया विद्यार्थ्यांसाठी खुला आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या सदस्य आणि पदाधिकारीसाठी खास व्यवस्था, सुविधा करण्यात आली आहे. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमच्या व्हॉट्सॲप ग्रुप अथवा सोशल मीडिया माध्यमांद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सहभागी सदस्यांना कार्यक्रमाची झूम ऑनलाईन लिंक संबंधित माध्यमातून पाठविण्यात येईल. कार्यक्रम दररोज सकाळी ७ ते ८ या वेळेत ऑनलाईन स्वरूपात होणार असून सहभागी सदस्यांनी वेळेआधी लॉग-इन करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हा व विभागीय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वेबसाईटवर सर्व माहिती आहे. https://aoliv.in/voiceofmedia इच्छुकांनी या लिंकवर नोंदणी करण्याची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *