श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील : धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट :
![]()
श्री बालाजी मंदिर खान्देशातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होणार – डी. आर. पाटील :
धरणगाव हेरिटेज गृपची बालाजी मंदिर – साखर विहिरीला भेट :
धरणगाव (प्रतिनिधी) :
शहरात पुनःनिर्माण होणारे श्री बालाजी मंदिर हे खान्देशातील एक देखणे, सुंदर आणि प्रसिद्ध तिर्थक्षेत्र होईल असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष डी. आर. पाटील यांनी केले. ते धरणगाव हेरिटेज वाॅक गृपच्या पाचव्या उपक्रमात बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते कमलेश तिवारी आणि डॉ. मिलिंद डहाळे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
शहरातील आणि परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देवून तेथील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवणे हा या गृपचा उद्देश आहे. या निमित्ताने सदस्यांनी श्री बालाजी मंदिर आणि साखर विहिरीला भेट दिली.
मंदिराचे ५००० स्क्वेअर फूट जागेत ७००० स्क्वेअरफूट तीन मजली बांधकाम होत आहे. सभागृहाची उंची ५२ फूट तर मंदिराची उंची ५६ फूट असेल. ललित सोमपुरा,गणेश शिखरावर यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम होत असल्याचे पाटील म्हणाले. यानंतर सदस्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील साखर विहिरीला भेट दिली. १९५२ च्या दुष्काळात याच विहरीने गावाची तहान भागवली होती असे प्रतिपादन कमलेश तिवारी यांनी केले. या विहरिची आजची अवस्था खूप दयनीय असल्याबद्दल उपस्थितांनी खंत व्यक्त केली. या विहिरीवर अनेकांना पोहणं शिकवणाऱ्या ईश्वरलाल कन्हैयालाल त्रिवेदी यांचा माजी पोलीस निरीक्षक मगनसिंग बयस व मुकेश तिवारी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानवस्त्र देवून गौरव करण्यात आला.
हेरिटेज वाॅक गृपची संकल्पना संयोजक जैनैद्र जैन यांनी तर बालाजी मंडळ, साखर विहिर आणि लक्कड विहरीसंदर्भातली प्रस्तावना समन्वयक प्रा.बी.एन.चौधरी यांनी मांडली. या प्रसंगी दिपक बाळापुरे, प्रा. बी.एन.चौधरी, वाय. डी. महाजन यांना ग्रंथ देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला चंद्रकांत अमृतकर, सुभाष जैन, चिमणलाल जैन, विवेक लाड, कडूभाऊ महाजन, लोकेश चौधरी, संजीव जैन, पी. वाय. वाजपेयी, जगदीश चव्हाण, सखाराम महाजन, प्रदिप बडगुजर, मिठाराम महाजन यांची उपस्थिती होती. अतुल डहाळे यांनी सूत्रसंचालन केले तर आर. एन. पुरभे यांनी आभार मानले. या उपक्रमाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असे उपक्रम गावातील एकोपा आणि संस्कृतीक देवाण घेवाणीसाठी आवश्यक असल्याचा सूर चर्चेत उमटला. प्रथम सुर्यवंशी, सुरज सुर्यवंशी यांनी अल्पोपहारासह कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

