बालकलाकारांनी जिंकली मने; वावडे शाळेचा सांस्कृतिक सोहळा दणक्यात
![]()
जि. प. वावडे केंद्र शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
अमळनेर प्रतिनिधी
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद वावडे केंद्र शाळा येथे सायंकाळी ६.३० वाजता भव्य-दिव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र फकीरा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री. छगन पंढरीनाथ पाटील, दादासो श्री. राजेंद्र प्रल्हाद पाटील, पोलीस पाटील श्री. दत्तात्रय ठाकरे, श्री. प्रल्हाद पाटील सर, श्री.संदीप सूर्यवंशी, श्रीमती.अर्चना बागुल. सौ. तृप्ती खैरनार सौ.सुवर्णा पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य व पत्रकार बंधू उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमाची “आपली संस्कृती – आपली परंपरा “ही थीम ठेवण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते, लोकनृत्ये, नाट्यछटा व समूहगीते यांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कलागुण व संस्कारांचे सुंदर दर्शन घडले.सदर कार्यक्रमाला व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन म्हणून गावकऱ्यांकडून एकुण रुपये 12000/- बक्षीस मिळाले.
व विशेष शिक्षक श्री.अमोल रमेश पाटील सरांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ रूपये – 5555/- कार्यक्रमाला दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाकीजा पिंजारी व श्री. समाधान खैरनार सर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बिऱ्हाडे, उपशिक्षक श्री. समाधान खैरनार, श्रीमती कविता खैरनार, श्रीमती पाकीजा पिंजारी, विषय शिक्षक श्री. अमोल पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीने विशेष परिश्रम घेतले .पालक व उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ठरला असून उपस्थितांच्या स्मरणात राहणारा असा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

