जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी*  *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*
1 min read

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी* *७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी* *पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील* *८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*

Loading

*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी*
*७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हयाच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी*

*पालकमंत्री यांनी घेतला चालू आर्थिक वर्षातील*
*८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा आढावा*

 

जळगाव प्रतिनिधी

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोघोग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सन २०२६–२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या प्रारूप जिल्हा वार्षिक आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच चालू आर्थिक वर्षातील ८३४ कोटी ६२ लक्ष रुपयांच्या निधीच्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये 618.99 कोटी रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून आर्थिक वर्ष संपण्याआधी तातडीने उर्वरित कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे तसेच कामे दर्जेदार पध्दतीने पुर्ण करुन संपूर्ण निधी वेळेत खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. यामध्ये सर्वसाधारण 677 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 93 कोटी तर आदिवासी उपयोजनेसाठी 64 कोटी 62 लक्ष इतक्या निधीचा समावेश आहे. जळगाव जिल्हा निधी खर्च करण्यांमध्ये तसेच प्रशासकीय मान्यता देण्यामध्ये विभागात पहिल्या क्रमांकावर आहे.
बैठकीच्या सुरुवातीस राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दिव्यंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हयातील आठवणी संदर्भात विविध विकास कामे, बैठका या संदर्भात जिल्हा नियोजन समिती, जळगाव यांनी तयार केलेली चित्रफीत दाखविण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले.
बैठकीत जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मान्यवराच्या उपस्थितीत करण्यात आले.
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन
पालकमंत्री क्रीडांगण विकास कार्यक्रम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये क्रीडांगण सुविधा निर्माण करण्यात येणार असून, १६६ शाळांमध्ये कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदान व २०० मीटर धावपट्टी विकसित करण्यात येत आहे, याचा लाभ सुमारे १ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांना होणार असून विद्यार्थ्यांचा शारीरिक-मानसिक विकास, आत्मविश्वास, शिस्त, सांघिक भावना व नेतृत्वगुण वृद्धिंगत होणार आहेत, सेवादूत जळगाव वेबसाइट व व्हॉट्सॲप चॅटबॉट, sewadootjalgaon.in या संकेतस्थळावरून महसूल, शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला-बालविकास, सामाजिक न्याय, अन्न व नागरी पुरवठा अशा ५५ पेक्षा अधिक सेवा घरपोच उपलब्ध होणार आहेत, ऑनलाईन अपॉइंटमेंट, एसएमएस सूचना व घरपोच सेवा यामुळे नागरिकांचा कार्यालयीन पाठपुरावा व खर्च कमी होणार आहे, AI आधारित जिल्हा रुग्णालय व धान्य गोदाम देखरेख प्रणाली, या प्रणालीमुळे OPD मधील गर्दी कमी होणार, आपत्कालीन सेवांना गती मिळणार, सुरक्षा व्यवस्था मजबूत होणार तसेच धान्य साठा व्यवस्थापन डिजिटलीकरणामुळे पारदर्शकता व खर्चात मोठी बचत होणार आहे, QR कोड आधारित अर्धन्यायिक प्रकरणांची ऑनलाईन सुनावणी, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभाग, तहसील व मंडळ स्तरावरील न्यायालयांच्या प्रत्येक सुनावणी नोटीसीवर QR कोड देण्यात येणार आहे, यामुळे अनावश्यक गर्दी कमी होऊन जलद व वेळेत प्रकरणांचा निकाल शक्य होणार असून नागरिकांचा वेळ व खर्च वाचणार आहे.
पुढील वर्षात जिल्हयात राबविण्यात येणारी ठळक विकास कामे:
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये क्रीडांगणे, विज्ञान प्रयोगशाळा व क्रीडा साहित्य उपलब्ध करणे, स्वच्छतागृहे व वॉल कंपाउंड नसलेल्या सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करणे, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, तीर्थक्षेत्रे, बाजारपेठ विकासासाठी जनसुविधा अंतर्गत ₹१०० कोटींची तरतूद, ३०५४ अंतर्गत ग्रामीण रस्त्यांद्वारे सुरक्षित व सुलभ दळणवळण, शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी सिंचन बंधारे उभारणे, आदिवासी पाड्यांना महावितरण अथवा सौरऊर्जेद्वारे वीज जोडणी, सर्व शासकीय शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयांत सौरऊर्जा प्रकल्प, शेतकरी व गावठाण दिवाबत्तीसाठी ट्रान्सफॉर्मरची प्राधान्याने उभारणी, पशुधनासाठी ‘गाव तेथे खोडा’प्रत्येक ५ कि.मी. परिसरात पशुवैद्यकीय सुविधा, ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा, जिल्हयातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी एस्कॉनसह कॅन्सर तपासणी व्हॅन, महानगरपालिका व नगरपालिकांत रस्ते, गटारी व वीज सुविधांसाठी वाढीव निधी, प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र, INDUSTRY 4.0 अनुषंगाने ITI मध्ये अल्प व दीर्घकालीन अभ्यासक्रम, गतीमान प्रशासनातंर्गत सर्व शासकीय कार्यालयांचे डिजिटलीकरण व आधुनिकीकरण, ग्रामीण भागातील १००% अंगणवाड्या बांधकामे पूर्ण करणे, अजिंठा चौफुल्ली ते विमानतळापर्यंत LED पथदिवे, महिला व बालकांसाठी तालुकास्तरीय महिला व बालविकास भवन उभारणार.
पालकमंत्र्यांनी बैठकीत दिलेले निर्देश;
मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करावीत, अपूर्ण कामांसाठी निधीची मागणी तात्काळ डीपीडीसीकडे सादर करावी.
महावितरणची सर्व कामे ई-निविदा प्रक्रियेद्वारे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत जिल्ह्यात १५३ उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी ४० उपकेंद्रांमधून १२० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. यामुळे ६० हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळत आहे.
जिल्हयातील रुग्णालयांमध्ये विशेषतः सर्पदंश औषधांचा तुटवडा होणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आरोग्य विभागांतर्गत उपलब्ध सुविधांचा व्यापक प्रचार-प्रसिद्धी करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हयातील खासदार व आमदार यांना विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व इतर समारंभासाठी आमंत्रीत करण्यात यावे.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सन २०२६-२७ च्या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीत उपस्थित आमदारांनी जनहिताचे विविध मुद्दे अभ्यासपूर्वक मांडले.
जिल्ह्यात होणाऱ्या दूध भेसळी संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी बैठकीत महत्त्वाचा मुद्दा मांडला यावर सर्व आमदारांनी सहमती दर्शवली तेव्हा या संदर्भात, पालकमंत्री श्री.पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री.घुगे यांना बैठक घेण्याचे सूचना दिल्यात.
जिल्हयात वाढत असलेल्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येबद्दल आमदार किशोर पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुद्दा मांडला यावर चर्चेअंती जिल्ह्यामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दोन एस्कॉनसह कॅन्सर व्हॅन मंजूर करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरात तीन कोटी रुपये खर्च करुन रिंग रोड तयार करण्याबाबत मांडलेल्या मुदयांस बैठकीत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हयातील दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच गुटखा विक्री बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी अशा सूचना दिल्यात.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विद्युत विभागातर्फे जिल्ह्यातील बसवण्यात येणाऱ्या ट्रान्सफॉर्मर संदर्भात दहा लाख रुपयांच्या वर मंजूर कामांची टेंडर प्रक्रिया करण्याबाबत सूचना दिल्या, आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
जळगाव जिल्ह्याला 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जिल्हयाला राज्यात प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागास राज्यात तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाच्या अभिनंदनचा ठराव मांडला त्यास पालकमंत्री श्री.पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व वस्त्रोघो मंत्री सावकारे यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा प्रशासनाच्याउत्कृष्ठ कामगिरी केलयाबाबतच्या अभिनंदन ठराव सर्वांनीमते मंजूर करण्यात आला. तसेच जिल्हा नियोजन समिती मार्फत होणाऱ्या कामा संदर्भात, जिल्हाधिकारी श्री घुगे व जिल्हा नियोजन विभाग यांचा अभिनंदनचा ठराव मांडण्यात आला त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. या बैठकीला जिल्हा पेालिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम

तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
*********

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *