एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन, त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार
![]()
एकरूखी गावावर शोककळा – जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन
त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील एकरूखी येथील आदरणीय व सर्वपरिचित व्यक्तिमत्त्व, दिवंगत दादासो विक्रम झिपरू पाटील (पोलीस दादा) यांच्या पत्नी तसेच दिलीप विक्रम पाटील व अमळनेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र समिती प्रमुख प्रा. सुरेश विक्रम पाटील यांच्या मातोश्री श्रीमती जिजाबाई (अक्का) विक्रम पाटील यांचे निधन वयोमानाने झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच एकरूखी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
जिजाबाई (अक्का) या अत्यंत प्रेमळ, कष्टाळू, संयमी आणि कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिचित होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंबाच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या मातृत्वाच्या छायेखाली वाढलेले कुटुंब आज समाजात विविध क्षेत्रांत कार्यरत आहे, हीच त्यांच्या संस्कारांची जिवंत साक्ष आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता, एकरूखी ता. अमळनेर येथून निघणार आहे. नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
💐💐💐💐💐
प्रा.मंदाकिनी भामरे
राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्ष अमळनेर

