“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन
1 min read

“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन

Loading

“स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा!” — अमळनेरमध्ये मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीज; सह आयुक्त कपिल पवार यांचे मार्गदर्शन

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीतील यशाचा टक्का वाढावा आणि त्यांना स्वतःच्या तयारीचे अचूक मूल्यमापन करता यावे या उद्देशाने मोफत पोलीस भरती टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना तब्बल २० मोफत सराव चाचण्या सोडवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रसंगी नाशिक येथील आदिवासी विकास विभागाचे सह आयुक्त कपिल पवार अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की,

“टेस्ट सिरीज म्हणजे फक्त प्रश्नपत्रिका सोडवणे नव्हे, तर स्वतःच्या क्षमतेचा आरसा पाहणे आहे. आपली चूक नेमकी कुठे होते, कोणत्या विषयात आपण मागे आहोत आणि तयारीत कोणते बदल आवश्यक आहेत, हे टेस्ट सिरीजमधून स्पष्ट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.”
हा उपक्रम पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अमळनेर, पातोंडा परिसर विकास मंच आणि राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला.
कपिल पवार यांनी पुढे सांगितले की, भविष्यात राज्यसेवा, गट ब, गट क तसेच यूपीएससी परीक्षांसाठी स्वतंत्र ५० विद्यार्थ्यांची विशेष बॅच तयार करून त्यांना उच्च दर्जाचे मोफत मार्गदर्शन देण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांनी दिवसाचे योग्य नियोजन करून अभ्यासाची सवय लावावी, असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. टेस्ट सिरीजमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या उपक्रमासाठी जिजाऊ अभ्यासिकेचे संचालक विशाल घिसाडी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयसिंग पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *