महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !… माजी विद्यार्थी एडवोकेट रवींद्र गजरे यांच्याकडून शाळेला भारतीय संविधान भेट
![]()
महात्मा फुले हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !…
माजी विद्यार्थी एडवोकेट रवींद्र गजरे यांच्याकडून शाळेला भारतीय संविधान भेट !…
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्ग नववीत प्रथम येणारी विद्यार्थी वैभव राकेश माळी याच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन झाले तदनंतर तंबाखूमुक्त व साक्षरतेची शपथ घेण्यात आली. यानंतर शहरात रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला सर्व शिक्षक बंधु -भगिनी यांसह विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. प्रजासत्ताक दिनाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते. राष्ट्रीय मतदार दिन, हिंद की चादर गुरु तेग बहादुर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते शालेय शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. शाळेचे माजी विद्यार्थी एडवोकेट रवींद्र गजरे यांच्याकडून शाळेला भारतीय संविधान भेट दिले. निवृत्ती महाजन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार, माजी मुख्याध्यापक एम के महाजन, एस डब्ल्यू पाटील, माजी क्रीडा शिक्षक व्ही पी महाले, सुखदेव महाजन, मोतीलाल महाजन, गोपाल महाजन, निवृत्ती महाजन, मोरवकर, धीरज महाजन तसेच सामाजिक , शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर व पालक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.

