राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !, शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !…..
1 min read

राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !, शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !…..

Loading

राष्ट्रीय मतदार दिनी म.फुले हायस्कूल येथे चित्रकला स्पर्धा !….

शाळेतील बीएलओ यांचा नायब तहसीलदारांच्या हस्ते सन्मान !…..

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस व्ही आढावे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसिलदार सी बी देवराज उपस्थित होते. प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील व मान्यवरांनी राष्ट्रीय मतदार दिनाची शपथ घेतली. सी बी देवराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मतदाराचे अधिकार व राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्त्व सांगितले व चित्रकला स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शाळेतील बी एल ओ एम बी मोरे ,पी डी पाटील, व्ही टी माळी, गोपाल महाजन यांचे नायब तहसिलदार सी बी देवराज यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *