समस्त ब्राह्मण समाज महासंघ अमळनेर आयोजित तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* .
![]()
*समस्त ब्राह्मण समाज महासंघ अमळनेर आयोजित तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न* .
अमळनेर येथील विविध ब्राह्मण संस्थांनी एकत्रित येऊन आयोजित केलेला तिळगुळ समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम वाडी संस्थानातील भक्तनिवास येथे अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत दिनांक 24 रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुहास देशमाने व सौ मृणाल देशमाने हे होते. ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष डॉ, शशांक जोशी व शु. यजुर्वेदी ब्रा.संस्था अध्यक्ष प्रा डॉ प्रभाकर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.. वे.शा. सं. अभयशास्त्री व पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी वेदघोष करून. परशुराम भगवान प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला
सौ पूर्वा वशिष्ठ सौ सुरश्री वैद्य श्रीमती नयना कुलकर्णी यांनी सुश्राव्य सुमधुर गीतांचे सादरीकरण केले .
श्रीमती स्नेहा एकतारे यांनी निवेदन केले .
भक्तनिवास येथे झालेल्या या कार्यक्रमाला दोनशेपेक्षा जास्त ब्राह्मण बंधू-भगिनींची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पालखे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर अपर्णा मुठ्ठे अध्यक्ष ब्राह्मण महिला सोमनाथ ब्रम्हे अध्यक्ष ऋग्वेदी ब्राह्मण संघ सुनील जोशी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाठशाळा. राजेंद्र निजामपूरकर गुरुजी अध्यक्ष पुरोहित संघ. डॉक्टर मिलिंद वैद्य पंकज मांडे. प्रसाद जोशी शिवा कुलकर्णी रमेश जोशी इत्यादींनी सहकार्य केले. समाज बांधवांच्या एकत्रीकरणाच्या या प्रयत्नात सर्वांनी सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.. जय परशुराम🚩🚩🚩

