धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आटाळे येथे उद्घाटन*
1 min read

धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आटाळे येथे उद्घाटन*

Loading

*धनदाई महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आटाळे येथे उद्घाटन*

अमळनेर : येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमानुभव शिबिराचे उद्घाटन नुकतेच आटाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. भारतीय सैन्य दलात सेवा बजावलेल्या माजी सैनिक अनिल बाविस्कर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आटाळे गावच्या सरपंच रत्नाबाई पाटील, उपसरपंच सोनाली मिस्त्री, धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका प्रमिलाताई पाटील, रेखा पाटील, प्रा. निशा पाटील आटाळे गावचे पोलीस पाटील भिमसिंग पाटील, मुख्याध्यापक योगेश्वर पाटील, शाळाव्यवस्थापन समिती सदस्य मंगलाबाई मिस्त्री हे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच. एम. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते
शिबिराचे उद्घाटन राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले. शिबिराचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. महादेव तोंडे यांनी दिनांक 22 ते 28 जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या शिबिराचे वेळापत्रक विद्यार्थ्यांना समजावून सांगत शिस्त व श्रमानुभवाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर आपल्या उद्घाटकीय मनोगतात माजी सैनिक अनिल बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना देश व समाजाची सेवा करण्यासाठी कष्ट करण्याचे आव्हान केले. संस्थेतर्फे रेखा नंदूकुमार पाटील यांनी तर गावातर्फे शांताराम मिस्त्री यांनी विद्यार्थ्यांना शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर एक सुवर्णसंधी असून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी या शिबिराचा निश्चित उपयोग होईल असे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
उदघाटन समारंभाचे सूत्रांचालन डॉ. लिलाधर पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संगीता चंद्राकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भगवान भालेराव, डॉ. प्रवीण पवार, डॉ. रमेश पावरा,डॉ. शैलेश पाटील, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. भाविका सूर्यवंशी, प्रा. रवींद्र चौधरी, श्री. राजेंद्र पाटील आदी मान्यवर तर शिबिरात सहभागी होण्यासाठी ७५ स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *