शाहू नगर मार्ग मोकळा; रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब अखेर बाजूला  नगरसेविका निलीमा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश – नागरिकांचा सुटकेचा निश्वास
1 min read

शाहू नगर मार्ग मोकळा; रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब अखेर बाजूला नगरसेविका निलीमा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश – नागरिकांचा सुटकेचा निश्वास

Loading

शाहू नगर मार्ग मोकळा; रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत खांब अखेर बाजूला

नगरसेविका निलीमा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश – नागरिकांचा सुटकेचा निश्वास

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १६ मधील शाहू नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून नागरिकांच्या जीवाला धोका ठरणारा विद्युत खांब अखेर रस्त्याच्या मधोमधून हलवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
हा खांब थेट रस्त्याच्या मधोमध उभा असल्यामुळे वाहनचालक, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रात्रीच्या वेळी अपघात होण्याची भीती अधिक वाढत होती. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडले होते.
या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेविका सौ. निलीमा रवि पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या प्रयत्नांना हितेंद्र बढे (सहाय्यक अभियंता, MSEB, अमळनेर) यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि अखेर हा धोकादायक खांब रस्त्याच्या बाजूला सुरक्षितपणे हलवण्यात आला.
या कामामुळे शाहू नगरकडे जाणारा मार्ग आता अधिक सुरक्षित व मोकळा झाला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “हा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता; अखेर तो सुटल्याने मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
कामाच्या ठिकाणी रवि पाटील यांच्यासह कपील पाटील, विलास पवार, विजय शिसोदे, कुवर सर, चौधरी सुर, देसले सर, अशोक सोनार, किशोर सैंदाणे, कल्पेश सांळुखे, विजय वाणी, कविष पाटील, अमित सोनार, मोहित पवार, सागर विसपुते, बापु सोनार, भरत ठेकेदार, चेतन पवार, भैय्या ठेकेदार (मंगरूळ) आदी मान्यवर व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या समन्वयातून विकासकामे कशी मार्गी लागतात, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *