श्री मंगळग्रह मंदिरात ‘श्री विद्याविनायक याग’ची पूर्णाहूतीने मंगल सांगता  द्रौ. रा. कन्या शाळेतील ९ विद्यार्थिनींचा वेदमंत्रांनी सहभाग; वसंत पंचमी निमित्त भक्तिमय वातावरण
1 min read

श्री मंगळग्रह मंदिरात ‘श्री विद्याविनायक याग’ची पूर्णाहूतीने मंगल सांगता द्रौ. रा. कन्या शाळेतील ९ विद्यार्थिनींचा वेदमंत्रांनी सहभाग; वसंत पंचमी निमित्त भक्तिमय वातावरण

Loading

श्री मंगळग्रह मंदिरात ‘श्री विद्याविनायक याग’ची पूर्णाहूतीने मंगल सांगता

द्रौ. रा. कन्या शाळेतील ९ विद्यार्थिनींचा वेदमंत्रांनी सहभाग; वसंत पंचमी निमित्त भक्तिमय वातावरण

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील प्राचीन व पवित्र अशा श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंती व वसंत पंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री विद्याविनायक यागा’ची भक्तिभावपूर्ण वातावरणात पूर्णाहूती देत मंगलमय सांगता करण्यात आली.
गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी मंगलमय मंत्रघोषात यागास प्रारंभ झाला होता. त्यानंतर शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता द्रौ. रा. कन्या शाळेतील नऊ विद्यार्थिनींच्या हस्ते यागाची विधिवत पूर्णाहूती पार पडली. लहान वयात वेदसंस्कारांचा परिचय घडवून देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी विशेष भावस्पर्शी ठरला.
वसंत पंचमी निमित्त श्री मंगळग्रह देवतेचा केशरजलाद्वारे अभिषेक करण्यात आला. प्रारंभी स्थापित देवतांची प्रातःपूजा संपन्न झाली. त्यानंतर श्री गणेश व सरस्वती मातेचा ब्रह्मनस्पती सूक्त व मेधा सूक्त या यजुर्वेदीय सूक्तांनी अभिषेक करण्यात आला. सरस्वती मातेचे पांढऱ्या पुष्पांनी अर्चन करून ज्ञानदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यानंतर एक हजार मंत्रोच्चारांसह सरस्वती मातेस हवन विद्यार्थिनींच्या माध्यमातून करण्यात आले. या पवित्र विधीची सांगता मंगळग्रह सेवा संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी व सचिव सुरेश बाविस्कर यांच्या हस्ते पूर्णाहूती देऊन झाली. शेवटी झालेल्या महाआरतीने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या यागासाठी तुषार दीक्षित गुरुजी, प्रसाद भंडारी गुरुजी, वैभव लोकाक्षी गुरुजी, शुभम् वैष्णव गुरुजी, यश जोशी गुरुजी, परशुराम शर्मा गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
धार्मिक परंपरा, वेदसंस्कार आणि विद्यार्थिनींचा सहभाग यामुळे हा सोहळा अमळनेरच्या सांस्कृतिक जीवनातील एक संस्मरणीय अध्याय ठरला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *