“या खंडहरात आजही ऐकू येतात स्वप्नांचे सूर…”
![]()
या खंडहर ची…..ती कहाणी
इथे धडे शिकण्यासाठी
राहून गेलेल्या
त्या मुलांचे काय झाले….
चरे दिसतात त्या भिंतींवर…
तडे बुजन्यास ….
परत फिरतील का रे…. पाखरांनो
कवी मित्र…गणेश नागवडे
यांची माफी मागून….
या ओळींचा सहारा घेतं….थोडा बदल करून ही सत्य कहाणी मांडतोय…
पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी अमळनेर
माझा प्रताप महाविद्यालयीन जीवनाचा तो सुवर्णकाळ..वर्ष…1984…ते 1988…
ही जी खंडहर झालेली वास्तू तुम्हीं बघत आहात ना…ती या काळात मुलांचे वसतिगृह असायचे…साधारण दीड दोन किलोमीटर प्रताप महाविद्यालय… गलवाडे रस्ता…रेल्वे लाईन ला लागून असलेले हे वसतिगृह…
या काळात मुलांना वसतिगृह मिळणे अशक्य एव्हढ्या नावारूपास असलेलं आमचे प्रताप महाविद्यालय…
अशा वेळी धडगाव. मोलगि.अक्कलकुवा.नंदुरबार.खापर.अश्या आदिवासी भागातून ही लेकरं शिक्षणासाठी यायची…शिक्षणाचे महत्व तेंव्हा उमजले होते..या मुलांना महाविद्यालयीन प्रांगणात वसतिगृहात राहण्यासाठी जागा उपलब्धते मुळे मिळत नव्हती…म्हणून काही मुले यांच्यासाठी ही वास्तू…
तिचे नावं संमत हॉस्टेल…त्या हॉस्टेल मध्ये मुले राहायची….
तो साठ व्हॉट चां अंधुकसा बल्ब ..त्या त्यांच्या लोखंडी पेट्या… सोबत असलेल्या गोधडी…या मोजक्या सामानाशी त्यांचा तो शिक्षणाचा झगडा झगडत राहून शिकत गेलेत..कधी कधी उपाशी तपासी झोपून या वस्तीतून आपल्या स्वप्नांची उड्डाण साठी सज्ज होत होती…
जवळ जेवणाची मेस व्वा सोय नव्हती…दररोज या अंगणात चुलीवर खिचडी शिजवताना मी पाहिले होते…
प्रचंड यातना
प्रचंड मेहनत यांनी ही वास्तू हे अंगण त्यांनी सजवले होते…
ही त्या काळातील मुले आज कुठे आहेत.. कशी आहेत…मोठ मोठ्या पदावर राहून निवृत्त झालेत.. अश्या त्या मुलांना ही आपली वास्तू…तो काळ दाखवण्याची ही प्रामाणिक धडपड आहे…
अमळनेर शहरातील दानशूर देशमुख परिवार यांनी ती जागा व वास्तू उपलब्ध करून दिली होती…त्यांचे नाव सुध्दा त्या वेळी तिथे होते..
या त्या सोनेरी आठवणी मनात रुंजी घालतात ते वैभव तेव्हाचे आठवत बसतो..
या साठी चा फेरफटका मारीत असताना क्षणभर त्या पायऱ्यांवर बसलो… ती मुले इथेच आहेत…असा भास झाला…
आज ही वास्तू खुश होती…
आम्हीं आमच्या आठवणी जोजवत होतो..
आतून त्या निघून गेलेल्या मुलांचा कल्लोड ऐकू येत होता…
सूर्य मावळतीला येऊन… समोरच ती त्या रुळावरून आगीन गाडी सपकन निघून गेली.आम्ही भानावर आलो….
या द्वारे विनंती की…
ज्यांनी ज्यांनी येथे राहून शिकून गेले..त्यांनी कृपया त्या आठवणी सांगाव्या..
ही वास्तू
हे खंड हर तुमची ती कहाणी
ऐकणार आहे…
तुमचाच…
दिलीप सोनवणे
संमत हॉस्टेल .परिसर .अमळनेर

