1 min read

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेतील महापौर आरक्षण सोडत जाहीर

Loading

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेतील महापौर आरक्षण सोडत जाहीर

( मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे)

महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुका पार पडल्या आहेत. जनतेने दिलेला कौल सर्वांसमोर आलेला आहे.राज्यात निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही ठिकाणी भाजपाला इतर पक्ष व प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तयारी करावी लागणार आहे. युती,आघाड्या यांनी निवडून आलेले सर्व नगरसेवक आता आपला महापौर कसे निवडणार? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या पक्षांना स्थानिक पातळीवर आपल्याच मित्रपक्षाविरोधात निर्णय घेण्याची मुभा त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.

कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या गटासाठी आरक्षित आहे याचा तपशील
कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती

ठाणे – अनुसूचित जाती

जालना – अनुसूचित जाती (महिला)

लातूर – अनुसूचित जाती (महिला)

इचलकरंजी – ओबीसी

पनवेल – ओबीसी

अहिल्यानगर – ओबीसी (महिला)

अकोला – ओबीसी (महिला)

उल्हासनगर – ओबीसी

कोल्हापूर – ओबीसी

चंद्रपूर – ओबीसी (महिला)

जळगाव – ओबीसी (महिला)

मुंबई महानगरपालिका – खुला प्रवर्ग

पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग

छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)

धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)

अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)

भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग (महिला)

मालेगाव – खुला प्रवर्ग

मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग

नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)

नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)

पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग (महिला)

नाशिक – खुला प्रवर्ग

नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)

परभणी – खुला प्रवर्ग

सांगली-मिरज – खुला प्रवर्ग

वसई-विरार – खुला प्रवर्ग

सोलापूर – खुला प्रवर्ग

मुंबई महानगरपालिकेत 25 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा महापौर नियुक्त करण्यात येणार आहे.राज्यातील सर्वच जनतेचे व राजकीय नेत्यांचे मुंबईच्या महापौराकडे लक्ष लागले होते त्यामुळे मुंबईत भारतीय जनता पक्ष मुंबई अध्यक्ष अमित साटम व मंत्री आशिष शेलार यांचं राजकीय वजन मात्र नक्कीच वाढले आहे त्याचप्रमाणे मुंबई ताब्यात घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे केंद्रातील वजन वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *