अमळनेरच्या राजकारणात खळबळ — माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश लवकरच!
1 min read

अमळनेरच्या राजकारणात खळबळ — माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश लवकरच!

Loading

अमळनेरच्या राजकारणात खळबळ — माजी आमदार शिरीष चौधरी यांचा शिवसेना (शिंदे गट) प्रवेश लवकरच!

अमळनेर प्रतिनिधी –
अमळनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नव्या वळण देणारी मोठी घडामोड उघडकीस आली आहे. येथील माजी आमदार शिरीष चौधरी, जे यापूर्वी अपक्ष म्हणून निवडून आले होते, हे आता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा त्यांनी केली आहे.
मुंबईत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या निर्णयामुळे अमळनेर व जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चा रंगल्या आहेत.
“आमदारपदाचा कालावधी असो वा पुढील राजकीय प्रवास, जनतेच्या विश्वासाला न्याय देणे हीच माझी प्राथमिकता आहे,” असे शिरीष चौधरी यांनी बोलतांना सांगितले.
राजकीय पटलावर ही हालचाल आगामी निवडणुकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांना मानणारा मोठा वर्ग आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *