ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास
1 min read

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास

Loading

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षणाची दीपमाळ : व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रेरणादायी प्रवास

अमळनेर प्रतिनिधी
समाजातील सर्व स्तरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक दर्जेदार विशेषकरून इंग्रजी माध्यमातून शिक्षक मिळावे व ते ही पालकांना कमीत कमी शैक्षणिक फी आकारून ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या उद्देशाने कै.श्री दादासाहेब व्ही.एस पवार इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना संस्थेचे चेअरमन मा.श्री. उत्कर्ष पवार आणि संस्थेच्या सचिव सौ. अलका पवार यांनी केली. दुर्गा फाउंडेशन ची स्थापना सन 2010 साली झाली असून प्रत्यक्षात शाळेची सुरुवात 2014 साली ग्रामीण भागातील ढेकू येथून झाली.
सुरुवातीला शाळेची इमारत नव्हती तसेच विद्यार्थी देखील नव्हते. संस्थेचे चेअरमन मा. श्री.उत्कर्ष पवार व सौ. अलका पवार हे स्वतः घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश करत. सुरुवातीला त्यांना पालकांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही नवीन शाळा असल्यामुळे पालक आपल्या पाल्यास शाळेत प्रवेश केल्यास राजी होईना. पण हळूहळू परिस्थिती बदलली पालकांची शाळेकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक झाली,विद्यार्थी प्रमाणात वाढ झाली. नंतर शाळा ढेकूवरून अंमळनेर येथील रामवाडी भागात स्थलांतरित करण्यात आली. विद्यार्थीसंख्या वाढली, पालकांचा प्रतिसाद वाढला.शाळेला मान्यता इ. दहावीपर्यंत आहे परंतु वर्गखोल्यांच्या कमतरतेमुळे सध्या इयत्ता आठवी पर्यंत वर्ग सुरू आहेत. पुढच्या वर्षीपासून इयत्ता नववी व दहावीचे वर्गही सुरू करण्यात येतील.कोरोनापूर्वी विद्यार्थी संख्या भरपूर असताना शाळा सकाळ व दुपार अश्या दोन सत्रात भरत असे. तेव्हा शाळेची स्वतः ची बस देखील होती. परंतु कोरोनोकाळात शाळेच्या विकासाचा चढता आलेख सरसावला, विद्यार्थी संख्या कमी झाली.ऑनलाईन शिक्षण शहरी भागातील विद्यार्थ्यांना घेणे शक्य आहे पण शाळेतील शाळेत जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. ग्रामीण भागातील पालकांकडे मोबाईल नाहीत, गावात रेंज नाही यामुळे अशा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. या कोरोना काळामध्ये शाळेतील विद्यार्थी संख्या कमी झाली. त्यामुळे कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यावर संस्थेपुढे विद्यार्थी संख्येचे एक मोठे आव्हान उभे राहिले.
पण शाळेतील शिक्षण हे दर्जेदार त्यामुळे शाळेची शैक्षणिक प्रगती वाढू लागली परिणाम स्वरूप विद्यार्थी संख्याही वाढू लागले आज शाळेत एकूण 17 खेडयातील विद्यार्थी शिकत आहे त्यामुळे अंमळनेत तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात आमच्या शाळेने शिक्षणाच्या बाबतीत एक मानाचा तुरा रोवला आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक पालक हा आपल्या मुलांच्या एकूण शैक्षणिक प्रगतीबाबत समाधानी आहे.
आज शाळेची विद्यार्थी संख्या 300 असून प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते. शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवन सर्व अंगाणी विकसित व्हावे यासाठी त्यांच्या कलागुणांनाही हे जोपासण्याची जरूरी असते अशा विचारांनी नाट्यवाचन स्पर्धा, चित्रकला प्रविण्यस्पर्धा परीक्षा इत्यादी यामध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तेजन दिले जाते त्यांची योग्य ती तयारी,त्यासाठी लागणारे मार्गदर्शन असे अनेक कार्यक्रम सतत चालूच असतात. आणि त्याचा परिणाम म्हणून शाळेचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट पारितोषिके मिळवताना दिसतात शाळा olympiad रंगोत्सव,मंथन इ.स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविते तसेच विद्यार्थी देखील यात उत्साहाने सहभागी होतात. शाळेला Indian Talent Olympiad परीक्षा द्वारे राष्ट्रीय पातळीवर आयोजित परीक्षेद्वारे शाळेला *The Golden School Award*प्राप्त झाला आहे.तर शाळेच्या मुख्याध्यापिका यांना Best Principal Award हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त झाला आहे.रंगोत्सव या राष्ट्रीय स्तरावरील कलास्पर्धेत विद्यार्थी व शाळेने नावीन्य पूर्ण यश संपादन केले आहे व करीत आहे.या कलास्पर्धेत राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांनी भरपूर अवॉर्ड्स व मेडल्स प्राप्त केले आहे. यात शाळेला Global School Award, Best School for futuristic Education Award आणि India’s Activities Excellence Award हे नामांकित राष्ट्रीय पातळी पुरस्कार प्राप्त झाले आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना देखील उच्चतम यश प्राप्त झाले आहे. कु प्रांजल मनीषा सोनार (इ. 2री) या विद्यार्थ्यांनीने ITO ओलंपियाड या परीक्षेत State Rank 4, State Topper & Scholarship असे प्राविन्य मिळवले तर दहापेक्षा अधिक विद्यार्थी classroom topper तसेच Excellence Medal Award ने सन्मानित झाले.
शाळेने यशाचा सातत्याने चढता आलेख व गौरवशाली प्रवास निश्चित केलेला आहे.आम्ही शाळेमध्ये शैक्षणिक पर्यावरण तयार करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहोत. जे विद्यार्थ्यांना फुलण्यास मदत करते तसेच त्यांना वैयक्तिक विचार व त्यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या सर्वसमावेशक विकासासाठी शाळा ही व्यासपीठ प्रदान करते. शाळेने काही ध्येये व मानके निश्चित केलेली आहेत आणि ते साध्य करण्यासाठी शाळा नेहमी प्रयत्न करते मग ते शैक्षणिक, क्रीडा, शिस्त आणि नेतृत्व या क्षेत्रामध्ये असो. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टता हे कोणत्याही चांगल्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे आमच्या विद्यार्थ्यांनी यांचा अभिमान वाढवला आहे. अर्थातच शिक्षकांच्या वचनबद्धता, त्यांचे योग्य अध्यापन व मार्गदर्शन यास कारणीभूत आहे.तसेच आम्हाला पालक आणि शुभचिंतकांकडून नेहमी प्रोत्साहन दिले जाते आणि यांनी शाळेवर विश्वास दाखविला आहे आणि पूर्ण पाठिंबा दिला आहे.
शारीरिक तंदुरुस्ती यांनी आमच्या अभ्यासक्रमात महत्व आहे शाळेत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. शाळेतील विद्यार्थ्यांना रेड, ब्ल्यू, येलो, ग्रीन असा चार वेगवेगळ्या Houses मध्ये विभागले गेले आहे. प्रत्येक हाऊसचे व्यवस्थापन हाऊस मास्टर, हाऊस कॅप्टन्स आणि हाऊस परफेक्टस द्वारे केले जाते.दैनंदिन
क्रियाकलाप आयोजित करून शालेय उपक्रमांमधील ही स्पर्धांचे पद्धतशीर कर्तव्य बजावते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक नैतिक सामाजिक आणि मानसिक विकास करण्यासाठी विविध सह-अभ्यासक्रम व उपक्रम आयोजित केले जातात.
आंतरशालेय क्षेत्रात नियमित कौशल्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जातो. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान व्हावे यासाठी वर्षभरातील सर्व सण-उत्सव शाळेत देखील साजरा केले जातात. शैक्षणिक सहली, स्नेहसंमेलन, आनंद
मेळावा इत्यादींचे आयोजन केले जाते .
व्ही.एस. पवार स्कूलच्या कुटुंबात सुप्रशिक्षित आणि समर्पित शिक्षक कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे मुख्याध्यापकांसह आमचे शिक्षक सतत कार्यशाळा आणि विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहून अद्यावत राहण्याचा प्रयत्न करतात. लवकरच शाळेची नवीन इमारत बांधली जाणार आहे तेव्हा विद्यार्थी व पालकांसाठी अधिक सोयीसुविधा पुरवण्याचा शाळेचा मानस आहे. शाळेने शैक्षणिक विकासाचे अनेक टप्पे गाठले आहेत आणि अनेक गाठायचे आहे. स्थापनेनंतर या तेरा वर्षाच्या काळात शाळेच्या सर्व अंगाने एका होणाऱ्या भरभराटी मागे संस्थेचे चेअरमन, सचिव उपाध्यक्ष,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांचे श्रम, कर्तृत्व, दूरदृष्टी आणि औदाऱ्याचे बळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *