स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर येथे योग शिबिराचे संपन्न
![]()
स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर येथे योग शिबिराचे संपन्न
(कृष्णा अरुण महाजन,तालुका प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार एक महिन्याच्या योग शिबीराचे आयोजन 17 डिसेंबर पासून स्वातंत्र सैनिक जनार्दन सुखा खडके प्राथमिक विद्या मंदिर, जळगांव येथे करण्यात आले होते. गुलाबी थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी योग अभ्यासामुळे, विद्यार्थ्यांनी शिबिरात सक्रिय सहभाग आनंदाने घेतला.किशोरवयीन मुल व मुली यांनी शिबिराचा आनंद घेतला असून योगशास्त्र विभागाची विद्यार्थिनी सौ देवयानी नीलेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांकडून योगाचे धडे गिरवून घेतले. निरोगी आरोग्यासाठी योगाचे महत्व तणावातून मुक्त व एकाग्रते साठी योग हाच राजमार्ग आहे. अश्या या योग शिबिराच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापक श्री संजय आनंदा पाटील, शिक्षकवृंद श्री लीलाधर सर,श्रीमती सरस्वती मराठे, श्रीमती अर्चना पाटील, श्रीमती सरस्वती पाटील यांची उपस्थिती व सहकार्य लाभले. महिनाभरापासून सुरू असलेल्या योग शिबिरासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इंजि. प्रा.राजेश पाटील, प्रा. लीना चौधरी, प्रा. गीतांजली भंगाळे, प्रा. लिंता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.


