अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा
1 min read

अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा

Loading

अमळनेर नगरपरिषदेच्या नूतन सभापतींचा सन्मान – शहर विकासाला नवी दिशा

अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतींची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. परीक्षितजी बाविस्कर यांच्या हस्ते नूतन सभापतींना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
नवीन निवड झालेल्या सभापतींमध्ये बांधकाम सभापती श्री. साहेबराव पवार, पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील, आरोग्य सभापती प्रा. रामकृष्ण पाटील, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्वाती परदेशी, शिक्षण सभापती श्री. नावेद शेख, नियोजन सभापती श्री. प्रशांत निकम तसेच स्थायी समिती सदस्य श्री. महेश देशमुख यांचा समावेश आहे.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी सर्व नूतन सभापतींना त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत, अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने व लोकहिताच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक १६ चे सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक श्री. रवि पाटील उपस्थित होते. शहराच्या विकास प्रक्रियेत नूतन सभापतींचे कार्य मोलाचे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *