उपक्रमशील शिक्षिकेचा गौरव ,  श्रीमती प्रतिभा जाधव यांना जिल्हास्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार
1 min read

उपक्रमशील शिक्षिकेचा गौरव , श्रीमती प्रतिभा जाधव यांना जिल्हास्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार

Loading

उपक्रमशील शिक्षिकेचा गौरव ,

श्रीमती प्रतिभा जाधव यांना जिल्हा स्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार

अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव येथील अल्पबचत भवनात नुकतेच महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषदेच्या वतीने श्रीमती प्रतिभा देवराम जाधव (माध्यमिक विद्यालय, लोन ग्रुप, ता. अमळनेर) यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व उपक्रमशील कार्याबद्दल राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या परिषदेला समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे उपस्थित होते. तसेच प्रमुख व्याख्याते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, पत्रकार किरण सोनवणे, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
श्रीमती प्रतिभा जाधव या एक अत्यंत उपक्रमशील, कर्तव्यदक्ष व विद्यार्थीकेंद्रित शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. सध्या त्या पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीमध्ये विद्यमान संचालक म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहेत.
त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समता शिक्षक परिषदेने त्यांना सन्मानित केल्याने शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या गौरवाबद्दल त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष तथा साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे संचालक राजेंद्र पाटील,आशिष शिंदे, सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, मित्रपरिवार व हितचिंतकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
हा पुरस्कार म्हणजे गुणवंत शिक्षकांच्या कार्याला मिळालेली योग्य दखल असून, तो इतर शिक्षकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *