अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार  1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा
1 min read

अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार 1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा

Loading

अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार

1 फेब्रुवारीला संत शिरोमण रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघणार शोभायात्रा

अमळनेर ः येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर येथे बुधवार, दि. 14 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत सर्व संमतीने हा निर्णय झाला. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. डिगंबर महाले अध्यक्षस्थानी होते. यावेळी एकनाथ मोरे, प्रवीण वाघ, नरेश कांबळे, साहेबराव चव्हाण, गणेश जाधव, रवींद्र ठाकरे व रवींद्र साळुंखे व्यासपीठावर उपस्थित होते. सुनील मोरे, सागर मोरे व कमलेश विसावे व डॉ. डिगंबर महाले यांनी मनोगते व्यक्त केली.
11-1
संत रवीदासांच्या स्मारकाचाही निर्धार
शहरात सर्वत्र विविध साधू- संत आणि समाजसुधारकांची स्मारके आहेत. मात्र, अनेकदा मागणी करूनही संत रवीदास महाराज यांचे स्मारक उभारले गेले नाही. संत रवीदासांचा इतिहास व त्यांची थोरवी माहीत नसल्यानेही कदाचित असे घडले असावे, अशी खंत उपस्थितांनी व्यक्त केली. आता सर्व समाजबांधव मिळून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना याबाबत निवेदन देणार आहेत. वर्षभरात स्मारक न झाल्यास समाजबांधव वर्गणी करून संत रवीदासांचे स्मारक बांधतील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
11-1
असा साजरा होईल जयंती उत्सव
1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मरिमाता मंदिराजवळील संत रवीदास महाराज यांच्या मंदिरात सामुहिक पूजनाचा कार्यक्रम होईल. तेथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणूक माळीवाडा, वाडी चौक, सराफ बाजार, मोठा बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे गांधलीपूरा येथे सांगता होईल. तेथेही पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मरिमाता मंदिराजवळ प्रसाद वाटप होईल.
…………….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *