प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार
1 min read

प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार

Loading

प्रा. डॉ. राहुल निकम यांना राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्कार

अमळनेर प्रतिनिधी :
भगिनी मंडळ, चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. राहुल निकम यांना जळगाव येथे आयोजित समता शिक्षक परिषद मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘महात्मा फुले सत्यशोधक गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
या परिषदेस समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे यांनी अध्यक्षस्थान भूषविले होते. प्रमुख मान्यवर म्हणून नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, पत्रकार किरण सोनवणे, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रा. डॉ. राहुल निकम हे गेल्या अनेक वर्षांपासून शिव–शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार, तसेच भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांचा समाजातील विविध घटकांपर्यंत प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहेत. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक व वैचारिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या गौरवाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, प्रथितयश उद्योगपती आशिष गुजराथी, समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते प्रा. अशोक पवार, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, समता शिक्षक परिषदेचे जळगाव जिल्हाध्यक्ष (प. वि.) भैय्यासाहेब सोनवणे, अजय भामरे, बापूराव ठाकरे, सोपान भवरे,ईश्वर महाजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी प्रा. डॉ. राहुल निकम यांचे अभिनंदन केले आहे.
या पुरस्कारामुळे समाजकार्य व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *