गांधली येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
![]()
*गांधली येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर उत्साहात संपन्न*
अमळनेर प्रतिनिधी
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय व ग्रामपंचायत गांधली यांचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर
12 ते 18 जानेवारी दरम्यान उत्साहात संपन्न झाले.
रविवारी समारोप समारंभ पार पडला. समारोप समारंभ अध्यक्ष म्हणून अभिजीत सुभाष भांडारकर, प्रमुख उपस्थिती सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील, संचालक डॉ महेश रमणसिंग पाटील, अनिल शंकर वाणी, प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे, एम जे पाटील, युवराज दगडू पाटील, दत्त मंदिर संस्थानचे रघुनाथ नारायण पाटील, सहज योग चे मेजर पगारे, प्रवीण पाटील , रोटरी क्लब ऑफ अमळनेर अध्यक्ष देवेंद्र कोठारी , सचिव आशिष चौधरी व रोटरी क्लब सदस्य यांची उपस्थिती होती.
समारोप सोहळा, महाराष्ट्र गीत, राष्ट्रीय सेवा योजना गीत व स्वागत गीत सत्कार करण्यात करून सुरुवात झाली.
रोटरी क्लब ऑफ अमळनेर मार्फत शालेय विद्यार्थ्यासाठी आयोजित चित्रकला स्पर्धा विजेते विद्यार्थी यांना भेट वस्तू देण्यात देऊन सन्मान करण्यात आला. शिबिर इतिवृत्त आणि अहवाल वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ अनिता खेडकर यांनी केले.
पी आर ए पद्धती व तंत्र वापरून समाज कार्य महाविद्यालय विद्यार्थी कडून गाव अध्ययन करण्यात आले. गाव इतिहास, सामाजिक नकाशा, शिवार अभ्यास, हंगाम नकाशा, सूक्ष्म नियोजन, चपाती डायग्राम यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. शिबिरार्थी विद्यार्थी गोपाळ मैंराळे, यामिनी माळी, सचिन साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. धीमा राऊत व यामिनी माळी यांना उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून डॉ महेश पाटील यांच्या हस्ते पारितोषक देण्यात आले.
सूत्र संचलन स्वयंसेवक संध्या पाटील, प्रज्ञा शिरूडकर यांनी तर आभार सागर कोळी यांनी मानले.
कार्यक्रम अधिकारी
प्रा विजयकुमार वाघमारे,
डॉ सागरराज चव्हाण, डॉ अनिता खेडकर, प्रा धनराज ढगे यांनी सहभाग नोंदवला.

