नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा रोटरी क्लब तर्फे गौरव*  *रोटरी व्होकेशनल सर्विस लीडरशिप अवॉर्डने सन्मानित.*
1 min read

नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा रोटरी क्लब तर्फे गौरव* *रोटरी व्होकेशनल सर्विस लीडरशिप अवॉर्डने सन्मानित.*

Loading

▪️ *नोबेल फाउंडेशनच्या कार्याचा रोटरी क्लब तर्फे गौरव*

*रोटरी व्होकेशनल सर्विस लीडरशिप अवॉर्डने सन्मानित.*

गेल्या दहा वर्षापासून विज्ञान जागरूकता तसेच शिक्षण क्षेत्रात नोबेल फाउंडेशन चे कार्य सुरू आहे शेकडो विद्यार्थ्यांच्या इसरो भेटीचे स्वप्न नोबेल फाउंडेशनच्या माध्यमाने पूर्ण होत आहे यासह गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात विविध परीक्षांसाठी संस्थेतर्फे मार्गदर्शन केले जाते या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब जळगाव तर्फे रोटरी वोकेशनल सर्विस लीडरशिप आवडणे सन्मानित करण्यात आले.
नोबेल फाउंडेशन गेल्या दहा वर्षापासून विज्ञान व शिक्षण क्षेत्रात जागृतीसाठी कार्य करीत आहे गेल्या दहा वर्षात नवशीहून अधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या माध्यमातून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सारख्या उच्चतंत्रज्ञान संस्थेला भेट दिलेली आहे नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक गरजू विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन तसेच मोफत प्रशिक्षण दिले जात आहे नोबेल फाउंडेशन चे संचालक जयदीप पाटील यांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून ग्रामीण आदिवासी तसेच शहरी भागात मोठ्या प्रमाणात करियर तसेच विज्ञानाबाबत प्रबोधन घडवून येत आहे या कार्याची दखल घेऊन रोटरी क्लब तर्फे संस्थेला गौरविण्यात आले.
डॉ गिरीश सहस्रबुद्धे , डॉ अपर्णा भट, हर्षाली चौधरी, किरण महाजन, विजय डोहोळे , मनीष चिरमाडे यांनाही गौरवण्यात आले .
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, सचिव सुभाष अमळनेरकर, वोकेशनल कमिटीचे चेअरमन राजेश वेद तसेच रोटरी क्लब चे सर्व सदस्य उपस्थित होते.
नोबेल फाउंडेशन चे सर्व मार्गदर्शक माझ्या सहकार्य करणारे सर्व शिक्षक कार्यकर्ते विद्यार्थी व पालक या सर्वांच्या योगदानाने कार्य करण्याचे बळ मिळत आहे हा पुरस्कार सर्व विद्यार्थी व पालकांना अर्पण !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *