स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव , रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम
1 min read

स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव , रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

Loading

स्वावलंबनाच्या दिशेने पाऊल : आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांना जीवनकौशल्यांचा अनुभव

रणाईचे माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
आज शनिवार, दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने ‘आनंद मेळावा सन 2025-26’ या उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या आनंद मेळ्याचे उद्घाटन मा. आबासो श्री. शिवदास शेणपडू पाटील (माजी आदर्श शिक्षक) यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा. ज्ञानेश्वर इन्शुलकर सर, प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. महेश नेरपगारे सर, मा. श्री. सोनवणे सर, माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. पी. डी. पाटील, श्री. बी. डी. ठाकरे, श्री. व्ही. एस. कापडणीस, श्रीमती एस. आर. पाटील, श्रीमती रिना पाटील, श्री. डी. व्ही. देसले, लिपिक श्री. एल. व्ही. पाटील, शिपाई श्री. जी. टी. पाटील उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमास मा. दादासो भूषण विश्वासराव पाटील (माजी सरपंच, रणाईचे), मा. दादासो प्रकाश मणीराम बंजारा (आजि सरपंच, रणाईचे तांडा), ताईसो. दामिनी सोनवणे (माजी सरपंच, रणाईचे), मा. नानासो. श्री. जे. व्ही. पाटील (सरपंच, आंचलवाडी), मा. बापूसो अशोक पाटील (आंचलवाडी), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. ढोले सर, श्री. महेंद्र पाटील सर, श्री. रोकडे सर, श्रीमती वैशाली मॅडम तसेच विद्यार्थ्यांचे पालक श्री. जयसिंग बंजारा, श्री. सतीश पाटील, श्री. सचिन देवरे, श्री. राहुल जाधव, श्री. किशोर देवरे, श्री. सुभाष बंजारा, श्री. कैलास बच्छाव, श्री. राजेंद्र पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. प्रत्येक स्टॉलची सजावट आकर्षक असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांना पालक, ग्रामस्थ व पाहुण्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, संघभावना, आत्मविश्वास, नेतृत्वगुण व आर्थिक नियोजन यांसारखे महत्त्वाचे जीवनोपयोगी गुण विकसित होत असल्याचे दिसून आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, समन्वयक मा. पियुषदादा शिंदे तसेच मुख्याध्यापकांनी सर्वांचे कौतुक करून ‘आनंद मेळा’ अत्यंत यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
एकूणच, हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी शिकत-शिकत आनंद घेण्याचा प्रेरणादायी अनुभव ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *