अमळनेर तालुक्यातील 16 विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश: सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव
1 min read

अमळनेर तालुक्यातील 16 विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश: सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव

Loading

अमळनेर तालुक्यातील 16 विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश: सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील 16 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले असून, या विद्यार्थ्यांच्या यशाने संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. *आई जिजाऊ अध्यासिका* , लक्ष्य करिअर ॲकॅडमी आणि शिव ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश सर्वत्र कौतुकास पात्र ठरले आहे. या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचे वर्षाव होत आहेत.
या यशामागे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आणि त्यांचे संचालक व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. आई जिजाऊ अध्यासिकाचे संचालक विशाल घिसाडी सर, लक्ष्य करिअर ॲकॅडमीचे संचालक रोहित पाटील सर आणि शिव ॲकॅडमीचे संचालक अमोल सातपुते सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच, लक्ष्य करिअर ॲकॅडमीचे उपसंचालक संजय माळी, अमोल सातपुते सर, आशिष भोई सर आणि आई जिजाऊ अध्यासिकाचे सहकारी शशी परदेशी, विशाल बडगुजर गौरव वानखेडे, शुभम यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि आवश्यक ते मार्गदर्शन पुरवले. या सर्व शिक्षण संस्थांचे आणि मार्गदर्शकांचेही या निमित्ताने विशेष अभिनंदन केले जात आहे.
। स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये धीरज धनराज पाटील (CISF), कल्पेश गणेश सूर्यवंशी (BSF), गौरव पाटील (CRPF), सनी पाटील (CRPF), गोविंद पाटील (CISF), भावेश पाटील (ITBP), लोभस पाटील (CRPF), धीरज पाटील (CRPF), विकास कोळी (CRPF), रजनंदिनी पाटील (CISF), मनीष कुंभार (आसाम रायफल), चेतन कखरे (CISF), हर्षल पाटील (ITBP), कृष्णा पाटील (आसाम रायफल) आणि विलास पारधी (CISF) यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या निवडीबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. या समारंभात, पत्रकार गणेश बाविस्कर यांचा सत्कार विशाल संजय घिसाडी यांच्या हस्ते करण्यात आला, तर पत्रकार विशाल मैराळे यांचा सत्कार अमोल सातपुते यांनी केला. या सत्कार समारंभात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांचे मनोबल वाढले.
या 16 विद्यार्थ्यांच्या यशाने अमळनेर तालुक्यातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि जिद्द असल्यास कोणतेही यश अशक्य नाही, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *