संगणकशास्त्र विभागात ERP–SAP विषयावर व्याख्यान संपन्न*
![]()
*संगणकशास्त्र विभागात ERP–SAP विषयावर व्याख्यान संपन्न*
—————————————–
अमळनेर – खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संगणकशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान(रुसा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ERP–SAP या आधुनिक उद्योगोपयोगी प्रणालीवर आधारित मार्गदर्शनपर गेस्ट लेक्चर यशस्वीरित्या पार पडले.
प्रस्तुत कार्यक्रमासाठी ERP–SAP क्षेत्रातील तज्ज्ञ श्री. राकेश पाटील, SAP कन्सलटंट, वेरसीनो एजी, ऑग्सबर्ग, बव्हेरिया, जर्मनी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपयुक्त कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्रमुख वक्त्यांची ओळख प्रा.नम्रता बडगुजर यांनी करून दिली. यावेळी वक्त्यांनी ERP आणि SAP प्रणालींचे महत्त्व, त्यांचा उद्योग क्षेत्रातील वापर, करिअरच्या संधी, तसेच विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावीत याविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
प्रथम सत्रात ERP व द्वितीय सत्रामध्ये SAP च्या विविध मॉड्यूल्सबाबत तसेच प्रत्यक्ष उद्योगातील उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या गेस्ट लेक्चरला मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पुष्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित शिंदे यांनी केले तर प्रा. प्राची पाटील यांनी आभार मानले केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणकशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

