राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक
![]()
राजमाता जिजाऊ आणि बाल शिवबाच्या रूपात कु. विधी व चि. नितेश ठाकरे यांची भावस्पर्शी झलक
अमळनेर प्रतिनिधी
शिवजयंती व शिवचरित्रावर आधारित कार्यक्रमात कु. विधी आणि चि. नितेश बापूराव ठाकरे यांनी अनुक्रमे राजमाता–राष्ट्रमाता जिजाऊ आणि बाल शिवबा यांच्या वेशात साकारलेली भूमिका सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. पारंपरिक पोशाख, भावमुद्रा आणि सुसंस्कृत अभिनयातून जिजाऊंनी शिवबावर घडवलेले संस्कार व स्वराज्याची बीजे प्रभावीपणे सादर करण्यात आली.
बाल शिवबाच्या आत्मविश्वासपूर्ण हावभावांनी उपस्थितांना भारावून टाकले. या सादरीकरणातून इतिहास, संस्कार आणि प्रेरणा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी या बाल कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले.
रयत संदेशचे संपादक व कार्यकारी संपादीका
शिवमती पुनम ठाकरे,शिवश्री बापूराव ठाकरे
यांची कन्या व चिरंजीव आहेत.

