गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर*
![]()
*गांधली येथे समाजकार्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर*
अमळनेर
श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित समाजकार्य महाविद्यालय,
ग्रामपंचायत गांधली आयोजित सात दिवस, 12 ते 18 जानेवारी 2026 दरम्यान संपन्न होत आहे. विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिर, शाश्वत विकासासाठी युवक, पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर शिबिरात देण्यात येत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ व्ही एम रोकडे यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.
शिबिर उद्घाटन गांधली चे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी
डॉ महेश पाटील, प्राचार्य डॉ पी एस पाटील, विभाग प्रमुख डॉ जगदीश सोनवणे यांची उपस्थिती होती.
जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन आणि जिजाऊ वंदना करून उद्घाटन करण्यात आले.
प्रास्ताविक विभाग प्रमुख व समाजकार्य अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ जगदीश सोनवणे यांनी केले.
शिबिर उद्घाटन सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी गांधली येथे करण्यात येत असलेली विकास कामे, पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारण ,मियावाकी ऑक्सिजन पार्क, अध्यात्मिक विकास अश्या बाबीवर प्रकाश टाकण्यात आला.
प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी यांनी युवकावर श्रमसंस्कार महत्व अधोरेखित केले. आणि संस्थापक अध्यक्ष सुभाषदादा भांडारकर यांनी दिलेला शुभेच्छा संदेश दिला. गावातील ज्येष्ठ नागरिक रघुनाथ आबा पाटील, युवराज पाटील, माधवराव सर यांचे सहकार्य लाभत आहे.
कार्यक्रम अधिकारी म्हणून
प्रा विजयकुमार वाघमारे,
प्रा डॉ अनिता खेडकर, प्रा डॉ सागरराज चव्हाण, प्रा धनराज ढगे हे काम करीत आहेत.
उद्घाटन समारंभ सूत्र संचलन स्वयंसेवक सागर कोळी, यामिनी माळी यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ सागरराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

