कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात*  *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]*
1 min read

कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात* *ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]*

Loading

*कापडणे गावात सत्यशोधक समाजाची कृतीयुक्त सुरुवात*

*ग्रामस्थांनी अंधश्रद्धा व क्रमांकापासून दूर राहून सत्यशोधक विधी करावे : अरविंद खैरनार [ अध्यक्ष सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]*

तालुका प्रतिनिधी –

धुळे – कापडणे :- दिनांक ११ जानेवारी २६ रोजी कापडणे ता.जि.धुळे येथील रहिवाशी दिनकर माळी सर ( खलाणे ) यांच्या मातोश्री स्मृतीशेष कै.सुंदरबाई सदाशिवराव खलाणे (माळी ) यांचा दशपिंड (दशक्रिया ) विधी येथे महात्मा जोतीराव फुले स्थापित सत्यशोधक समाजोक्त पद्धतीने झाला. हा विधी सत्यधर्मीय विधीकर्ते शिवदास महाजन एरंडोलकर यांनी केला.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे संयोजक अरविंद खैरनार यांनी महात्मा फुले यांनी दिलेला मूळ सांस्कृतिक मार्ग का महत्त्वाचा आहे? या संदर्भात प्रबोधन केले हे प्रबोधन करताना त्यांनी खास करून भटजी ग्रहाची भीती दाखवून बहुजन समाजाला विविध धार्मिक विधींचे मार्गाने अज्ञानाचा फायदा घेऊन आर्थिक लुबाडणूक कशा प्रकारे करतो हे समजावून सांगितले तसेच घटस्थापना,वीर नाचविणे, शेंडी उतरविणे, जावूळ काढणे, ड्युट्या बुधल्या, खंडोबाचा तळी उचलणे या धार्मिक कार्यासाठी भटजीची आवश्यकता नसते तर मग लग्न,दशक्रियासाठी भटजीला का म्हणून बोलवावे? म्हणूनच राष्ट्रपिता जोतीफुले यांनी सांगितले की,आमचे विधी आम्ही करू म्हणूनच त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मीय पद्धतीने विधी कसे करावे हे समजावून सांगितले व त्याची पुस्तिका काढली याच मार्गावर सत्यशोधक समाज संघाने सुद्धा त्या पुस्तिका समाजाचे पैसे वाचावे यासाठीच छापलेल्या आहेत कि त्या पुस्तकांच्या आधारे शेतकरी, कष्टकरी समाजाने आपले धार्मिक विधी घरच्या घरी करावेत,मध्यस्थीला बोलावण्याची आवश्यकता नाही. तसेच खान्देशातील एकंदरीत सत्यशोधक चळवळ व प्राच्यविद्यापंडित शरद पाटील यांचा सुद्धा उल्लेख आवर्जून या प्रबोधनात करण्यात आला.
याप्रसंगी महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सत्यधर्माच्या अखंडाचे सामूहिक गायन झाले. कापडणे गावातील ग्रामस्थ तसेच दिनकर माळी यांच्या नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांनी या विधी बद्दल संतोष व्यक्त केला व भविष्यात असेच विधी आम्ही करू अशी प्रतिज्ञा सुद्धा घेतली.सत्यशोधक समाज विधीचे पुस्तकाची विक्रीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी महादेव डांबरे, पोपटराव खैरनार, प्रा.भूषण पाटील ,धनुर गावाचे माजी सरपंच हिरामण चौधरी, न्याहळोद येथिल प्रा.मोतिलाल कोळी व इतर वरिष्ठ मंडळी तसेच सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *