जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण  महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम
1 min read

जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम

Loading

जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेरमध्ये गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण

महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमय वातावरणात अध्यात्मिक उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी —
जागतिक पारायण दिनानिमित्त अमळनेर येथील संत गजानन महाराज मंदिर, जी.एम. सोनार नगर येथे आज गजानन विजय ग्रंथाच्या २१ अध्यायांचे अखंड पारायण भक्तिभावाने संपन्न झाले. अध्यात्म, श्रद्धा व सामूहिक साधनेचा जागतिक संदेश देणारा हा उपक्रम भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला.
गजानन महाराजांच्या महिला वारी प्रमुख सौ. ज्योतीताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील असंख्य महिला भगिनींनी या जागतिक पारायणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळी विधीवत आरतीनंतर पारायणास प्रारंभ झाला. “गण गण गणात बोते” या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने न्हाऊन निघाला.
गजानन विजय ग्रंथाच्या वाचनामुळे आजूबाजूचे वातावरण प्रसन्न, आनंददायी व अध्यात्मिक ऊर्जेने भारले गेले. जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून एकत्रित ग्रंथवाचन, नामस्मरण व सामूहिक प्रार्थनेतून विश्वकल्याण, सद्भावना व सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.
विशेष म्हणजे, संत गजानन महाराज मंदिरात दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. संत गजानन महाराज प्रकट दिन, जागतिक पारायण दिवस तसेच शेगाव पुरुष पायी वारी समारोप अशा विविध प्रसंगी भाविकांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे सर्व उपक्रम संत गजानन महाराज सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. आर. बी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या राबवले जात असून, या माध्यमातून भक्ती, सेवा व संस्कारांची परंपरा जोपासली जात आहे.
या कार्यक्रमास संत गजानन महाराज मंदिरातील महिला भगिनी, भाविक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा अध्यात्मिक उपक्रमांमुळे समाजात मानसिक शांती, सकारात्मक विचार व भक्तीभाव वृद्धिंगत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *