शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांची नाशिक विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*,   *बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत  ‘गणितीय संबोध’ विषयावर केले प्रभावी सादरीकरण*
1 min read

शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांची नाशिक विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*, *बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत  ‘गणितीय संबोध’ विषयावर केले प्रभावी सादरीकरण*

Loading

*शिक्षणसेविका रत्नमाला शिंदे यांची नाशिक विभागातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत  ‘गणितीय संबोध’ विषयावर केले प्रभावी सादरीकरण*

जळगाव:
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (पुणे) यांच्या वतीने राज्यभरातील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी विविध ४३ प्रकारच्या शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ‘बालमानसशास्त्र केस स्टडी’ स्पर्धेत जळगाव येथील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षणसेविका रत्नमाला मोहन शिंदे यांनी ‘गणितीय संबोध विकासातील अडथळे’ या विषयावर आपली केस स्टडी सादर केली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकताना नेमक्या कोणत्या अडचणी येतात, त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण आणि त्यावरील उपाययोजना, याबाबत त्यांनी परीक्षकांपुढे सविस्तर व प्रभावी सादरीकरण केले.
त्यांच्या या नावीन्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे रत्नमाला शिंदे यांनी जिल्हा स्तरावर जळगावमधून प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढील विभागस्तरीय फेरीत नाशिक विभागातूनही जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक येथील स्पर्धकांमधून त्यांची निवड झाली आहे. आता त्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करतील.
त्यांच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे आणि सर्व कार्यकारणी संचालक तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम, पर्यवेक्षक नरेंद्र पालवे सर तसेच शिक्षकवृंद यांनी त्यांचे विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *