अमळनेरकरांसाठी दिलासादायक उपक्रम; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन  लायन्स क्लब व एसएमबीटी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; हृदयरोग तपासणी शिबिर
1 min read

अमळनेरकरांसाठी दिलासादायक उपक्रम; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन लायन्स क्लब व एसएमबीटी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; हृदयरोग तपासणी शिबिर

Loading

अमळनेरकरांसाठी दिलासादायक उपक्रम; मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन

लायन्स क्लब व एसएमबीटी हॉस्पिटलचा संयुक्त उपक्रम; हृदयरोग तपासणी शिबिर

अमळनेर (प्रतिनिधी):
लायन्स क्लब, अमळनेर, नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर तसेच एसएमबीटी हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेरकरांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयविकाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता, वेळेवर तपासणी व योग्य सल्ला मिळावा या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात लहान मुलांसाठी (वय ० ते १८ वर्षे) विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्यासाठी २ डी इको तपासणी पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या रुग्णांसाठी अत्यल्प दरात तपासणीची सोय करण्यात आली आहे.
मोठ्यांसाठी नाव नोंदणी शुल्क ५० रुपये असून, ईसीजी, शुगर व बीपी तपासणी मोफत करण्यात येणार आहे. याशिवाय २ डी इको तपासणी फक्त ५०० रुपयांत करण्यात येईल.
हे शिबिर शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराची स्पेशालिटी – हृदयरोग असून, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क क्रमांक:
९१४५००१६५८ / ९८५०७८९५०४
शिबिराचे ठिकाण:
अस्मी सीटी स्कॅन व डायग्नोस्टिक सेंटर, नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या बाजूला, यशवंत नगर, मराठा मंगल कार्यालयाजवळ, अमळनेर.
या उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. अनिल शिंदे, डॉ. मयुरी जोशी, व लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील,कोषाध्यक्ष नितीन विंचुरकर यांनी केले आहे. हृदय आरोग्याची वेळेत तपासणी करून निरोगी जीवनाकडे पाऊल टाकण्याची संधी या शिबिरातून मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *