सायणे ता.जि.धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीरात विविध मान्यवरांचे प्रबोधन.*  *पक्षी निसर्गाचे शांत दूत.पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे उद्बोधन.*
1 min read

सायणे ता.जि.धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीरात विविध मान्यवरांचे प्रबोधन.* *पक्षी निसर्गाचे शांत दूत.पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे उद्बोधन.*

Loading

सायणे ता.जि.धुळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीरात विविध मान्यवरांचे प्रबोधन.

पक्षी निसर्गाचे शांत दूत.पक्षीमित्र अश्विन पाटील यांचे उद्बोधन.

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व गंगामाई एज्युकेशन ट्रस्टचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नगांव यांच्या संयुक्त विद्यमाने *राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर “शाश्वत विकासासाठी युवक पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर,* या विद्यापिठाच्या संकल्पनेवर आधारीत” सायणे ता.जि.धुळे येथे गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात दिनांक ०२/०१/२०२६ ते ०८/०१/२०२६ या कालावधीत आयोजित केले आहे.
या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीराचा मूळ उद्देश नियोजित प्रकल्प
शाश्वत विकासात युवकांचे योगदान, ग्रामस्वच्छता, पंचप्रण, दत्तक गावातील गरजा व समस्या विषयी सर्वेक्षण अभियान, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पाणी व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, व्यसन मुक्त भारत, मतदार जनजागृती अभियान, प्लास्टीक अभियान, बालविवाह कायदा व बालविवाह थांबविण्यासाठी जनजागृती. हे आहेत.
सदर शिबिरात व्याख्याने व वैचारिक प्रबोधन कार्यक्रम दररोज दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत पार पडतो.सदर कार्यक्रमाचे तिसरे पुष्प दिनांक ०४/०१/२०२६,वार- रविवार रोजी गुंफण्यासाठी *खानदेशातील सुप्रसिद्ध निसर्ग अभ्यासक व पक्षीमित्र*
*श्री.अश्विन लिलाचंद पाटील सर,(माध्यमिक.शिक्षक) अमळनेर यांचे*
*”पर्यावरण आणि पक्षी संवर्धन काळाची गरज”* या संकल्पनेवर व्याख्यान आयोजित केले होते. सदर मार्गदर्शन करतेवेळी पक्षी मित्रअश्विन पाटील यांनी *अनेक निसर्गातील पैलू उलगडून सांगितले* यात मुख्यत्वे
आज मानवाने केलेल्या अमर्याद विकासामुळे पर्यावरण संतुलनावर मोठा आघात झाला आहे.
आज आपण अनेक पर्यावरणीय समस्या अनुभवत आहोत,जसे की—
वाढते जागतिक तापमान (Global Warming),अनियमित पावसाळा, दुष्काळ आणि पूर,जंगलतोड
पाणी, हवा आणि माती प्रदूषण
जैवविविधतेचा ऱ्हास
या सर्वांचा सर्वात आधी आणि सर्वात जास्त फटका पक्षी आणि वन्यजीवांना बसतो.
पक्षी हे निसर्गाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत.पक्ष्यांमुळे कीटक नियंत्रण, परागीभवन,बीजप्रसार,अशा अनेक महत्वपूर्ण कार्य निसर्गात पक्षांकडून अविरतपणे घडत असतात. कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता हे पर्यावरणातले घटक रात्रं दिवस काम करत असतात.
जर एखाद्या परिसरात पक्ष्यांची संख्या कमी होत असेल,तर तो धोक्याचा इशारा असतो. व हा इशारा पर्यावरणातील बदलांचे संकेत दर्शवितो.
जर पर्यावरण वाचले नाही,
तर मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल.
पक्षी वाचले,तर पर्यावरण वाचेल.
पर्यावरण वाचले,तर मानव वाचेल.
अशा स्पष्ट शब्दात शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तदनंतर कार्यक्रमांतर्गत सरते शेवटी *श्री.पक्षीमित्र अश्विन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून* *एक संकल्प करून घेतला.* तो पुढील प्रमाणे
🌱 मी झाड लावेन
🐦 मी पक्ष्यांचे रक्षण करेन
🌍 मी पर्यावरणाचा मित्र बनेन
“निसर्ग वाचवा – भविष्य वाचवा”
सदर व्याख्यानाच्या सरते शेवटी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात टाळ्या वाजून भावना व्यक्त केल्या.
सदर व्याख्यान प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.आर.पी.पाटील सर,
प्रमुख वक्ते पक्षीमित्र अश्विन पाटील अमळनेर (माध्यमिक शिक्षक )प्रा.डॉ.गोकूळ निंबा पाटील सर (कार्यक्रम अधिकारी रा.से.यो.)
प्रा.गोविंद चंद्रसिंग पावरा सर
(अध्यक्ष.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रा.से.यो),प्रा.डॉ.सौ.भावना मुकूटराव पाटील (महिला कार्यक्रम अधिकारी रा.से.यो.) यांच्या समवेत शिबिरात सहभागी विद्यालयातील सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी व गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *