ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
![]()
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न
शिरूड | प्रतिनिधी :
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक वाचवा–लेक शिकवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरूड येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय आधार पाटील यांच्या हस्ते गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मेळाव्यात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध नृत्यप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजने अंतर्गत शिष्यवृत्तीचा धनादेश इयत्ता पहिलीतील कु. ज्ञानेश्वरी प्रवीण पवार हिला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले होते. ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, हायस्कूलचा शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मनमुराद खरेदी करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सुमारे ७,००० रुपये इतकी विक्री करत नफाही मिळवला. या अनुभवातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आत्मविश्वास व आनंदाचा अनोखा अनुभव मिळाला.
या मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री. मुकेश पाटील, सदस्य श्री. ज्ञानेश्वर महाजन, सदस्या सौ. उज्वला पाटील, सौ. सुवर्णा पाटील, श्री. गुलाब माळी, श्री. शामकांत पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन श्री. बापूराव महाजन, माजी उपसरपंच श्री. वसंत पाटील, दत्त वाचनालयाचे अध्यक्ष श्री. शशिकांत पाटील, जे. डी. अहिरे सर, श्री. विकास महाजन, माजी एसएमसी अध्यक्ष श्री. नंदलाल पाटील, रवी धनगर, प्रवीण बोरसे, ग्रामसेवक श्री. आर. एन. पाटील, पालक सदस्य अजय बोरसे, कविता बोरसे, शांताराम कोळी, विश्वास नेवाडेकर, आप्पा महाजन, गणेश महाजन, सुनील मिस्तरी, सुभाष महाजन, मनोहर पाटील, अमोल पाटील, सीमा महाजन, कावेरी कोळी, तसेच ग्लोबल महातेजचे वार्ताहर श्री. रजनीकांत पाटील, माजी विद्यार्थी अंकित पाटील, कुणाल महाजन, अंगणवाडी सेविका कुलकर्णी मॅडम, आशा सेविका कल्पना मॅडम, पोषण आहार सेविका सौ. सुवर्णा पाटील, शारदा पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. अनिल सूर्यवंशी सर, श्री. भूषण सोनवणे, श्री. गुलाब बोरसे, श्रीमती सविता बोरसे, श्रीमती देशमुख मॅडम, श्री. जाधव सर, श्री. निकम सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. किरण मारवडकर, उपशिक्षिका इंदुबाई महाले, श्रीमती कल्पना बडगुजर, श्रीमती संगीता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चंद्रकांत पाटील यांनी केले तर श्री. रवींद्र महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.



