दिल्लीच्या व्यासपीठावर अमळनेरचा गौरव मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान
1 min read

दिल्लीच्या व्यासपीठावर अमळनेरचा गौरव मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान

Loading

 

दिल्लीच्या व्यासपीठावर अमळनेरचा गौरव
मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणजे सामाजिक जाणिवेचे उचित भान असलेली संस्था आहे, हे दीर्घकाळापासून विविध प्रकारे सिद्ध झाले आहे. दिल्ली येथे देशातील अग्रगण्य समाजसेवी संस्थांच्या (एनजीओ) कार्यक्रमात संस्थेचे एकूणच कार्य पाहून संस्थेला मानाची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या वतीने विश्वस्त तथा दै. ग्लोबल महातेजचे संपादक आनंद महाले यांनी संस्था व श्री मंगळग्रह मंदिर यांनी केलेले व करीत असलेल्या सर्व कार्याची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या साह्याने इत्यंभूत माहिती दिली. उपस्थित प्रतिष्ठीत संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टाळ्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. एनजीओच्या क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे राजेश वर्मा यांच्या शुभहस्ते आनंद महाले यांना शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित देशभरातील अनेक मान्यवरांनी मंदिराला भेट देण्याची तथा समक्ष येऊन संस्थेचे कार्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली.
……………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *