फार्मसीच्या क्षेत्रात संशोधनाचा डंका; प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शोधनिबंध प्रसिद्ध
1 min read

फार्मसीच्या क्षेत्रात संशोधनाचा डंका; प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शोधनिबंध प्रसिद्ध

Loading

फार्मसीच्या क्षेत्रात संशोधनाचा डंका; प्रा. देवेश भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच शोधनिबंध प्रसिद्ध

आजच्या काळात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर टिकण्यासाठी संशोधनाची जोड असणे आवश्यक आहे​- प्रा. देवेश भावसार

अमळनेर प्रतिनिधी

औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि संशोधनाला मोठे महत्त्व आहे. याच क्षेत्रात आपल्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचे कार्य प्रा. देवेश भावसार यांनी केले आहे. नुकतेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले पाच महत्त्वाचे शोधनिबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. देवेश भावसार यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन कसे करावे, माहितीचे विश्लेषण कसे करावे आणि जागतिक दर्जाचे शोधनिबंध कसे लिहावेत, याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना औषधनिर्माण क्षेत्रातील नवनवीन आव्हाने आणि संधी यांची ओळख झाली आहे.

​या यशाबद्दल फार्मसी महाविद्यालयाचे चेअरमन योगेश मुंदडे, प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्रसोनवणे, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी प्रा. देवेश भावसार व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *