क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न…  समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
1 min read

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न… समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

Loading

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न…

समाजकार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर दिनांक 3 जानेवारी 2026 श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर परिसरात क्षेत्र कार्याच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित समुदायास मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयं सेवकांनी अमळनेर परिसरात असलेल्या शाळेमध्ये जाऊन, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. स्वच्छता अभियानाची रॅलीत गायत्री तुकाराम बोरसे व यामिनी तुकाराम माळी बी.एस.डब्ल्यू प्रथम वर्षाचे विद्यार्थीनीनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ओवी गाऊन उपस्थित मन जिंकले. सागर सुखदेव कोळीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा विजयकुमार वाघमारे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा अनिता खेडकर, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया, सहायक विद्यार्थी विकास अधिकारी तथा क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा डी आर ढगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *