क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी , महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती
1 min read

क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी , महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

Loading

क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महिला सक्षमीकरणाचा जागर, समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
क्षत्रिय फूलमाळी समाज संस्थेच्या कार्यालयात थोर समाजसुधारिका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ-श्रेष्ठ महिला, तरुणी व संपूर्ण महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीनाताई महाजन होत्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्राध्यापक विद्या बाविस्कर मॅडम तसेच चिमुकल्या श्रद्धा व गुंजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल व प्रेरणादायी माहिती सादर केली. स्त्री शिक्षण, समाज परिवर्तन व समानतेसाठी सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षाचे त्यांनी प्रभावी शब्दांत वर्णन केले.
या कार्यक्रमास सौ. सुरेखा पाटील, माजी नगरसेविका ज्योतीताई महाजन, चित्राबाई महाजन, बाविस्कर मॅडम, बोरसे मॅडम, हर्षदा पाटील, हर्षदा महाजन, द्वारकाबाई महाजन, सुमनबाई पाटील, गंगाबाई महाजन, वत्सलाबाई पाटील यांच्यासह समाजातील सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या.
तसेच समाजाचे अध्यक्ष श्री. दिलीप आत्माराम पाटील, संचालक मंडळ सदस्य दिनेश बापू महाजन, विजय सखाराम महाजन, खेमराज बोरसे सर, प्रवीण भाऊ महाजन, कैलास भाऊ महाजन, अ‍ॅड. सुरेश सोनवणे, संदीप महाजन, भास्कर ठाकरे, सोमनाथ मराठे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. नागराज माळी सर यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात शिक्षण, समानता व सन्मानाची मूल्ये जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व प्रेरणादायी संदेशासह संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *