क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.
1 min read

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.

Loading

क्रांतिकारी ज्योतिबाची पेटती मशाल थोर सावित्रीबाई फुले.

आज भारतात शिक्षणाची जी क्रांती दिसत आहे त्याचे श्रेय केवळ तात्यासाहेब ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. मनुवादाने पछाडलेल्या ह्या देशात बहुजन शिक्षण घेऊ शकत नव्हता.पेशवेशाही चा अंत नुकताच झाला होता परंतु त्याची धग गेलेली नव्हती अशा वेळी जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक व सामाजिक काम केले त्याला जगात तोड नाही.मनुवाद्यांची मक्तेदारी असलेल्या ह्या देशात फुले दांपत्य जीवन देशासाठी समर्पित करून देशाला ज्ञानाच्या उंबरठ्यावर आणीत होते. अशा या कुटुंबात सावित्रीबाई हिचे अप्रतिम योगदान आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ३जानेवारी १८३१ ला झाला. एका विचाराने संस्कारी कुटुंबात सावित्रीबाई चा जन्म झाला. ते एकूण ४ भावंडे त्यात सावित्रीबाई सर्वात लहान होती. वडील खंडोजी नेवसे पाटील इनामदार होते.त्यांच्याकडे शेती होती. गावात त्यांची चांगली प्रतिष्ठा होती. सावित्रीबाई च्या आई लक्ष्मीबाई फार नीतीवंत होत्या. सावित्रीबाई विनयशील, शांत व संयमी होत्या. त्याकाळी बहुजन लोकांना शिक्षण बंदी होती. स्त्री बाबत तर फारच जाचक नियम लादलेले होते. चूल व मूल सांभाळणे हेच स्त्री चे कर्तव्य मानले जात होते. सावित्रीबाई प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. सावित्रीबाई जन्माला आल्या त्यावेळी सर्व गावात खडी साखर वाटली गेली. शेतात आई वडीलांना मदत करणारी सावित्री आपल्या मैत्रिणीसोबत खेळ खेळत असे. त्या काळी मुलीचे लग्न लहान वयात होत असे. त्यामुळे सावित्रीचे लग्न गोविंदा फुले यांचा तेजस्वी पुत्र जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीराव १३ वर्षाचे होते.जोतीरावाची मावस बहीण ही जोतीरावांकडे राहत होती. तिचे ख्रिश्चन मिशनरी लोकांशी चांगले संबंध होते. त्यामुळे जोतीराव फुले यांना इंग्रजी शाळेत शिकता आले.
तात्यासाहेब जोतीराव फुले यांना ब्राम्हण मित्र सखाराम परांजपे याच्या लग्नातील वरातीतून बाहेर काढण्यात आले.. कारण काय तर शूद्र आहे म्हणून उच्चवर्णीय ब्राह्मणात शोभणार नाही. या गोष्टीचा परिणाम जोतीरावांच्या क्रांतीत झाला. जोतिरावांनी समाजाचा अभ्यास केला. त्यात अंधश्रद्धा, कर्मठ रूढी, अमानवी प्रथा ह्या समाजाला घातक असल्याचे समजले. स्त्रीला तर कोणतेच स्वातंत्र्य दिलेले नव्हते. ज्योतीरावांनी जगातील थॉमस पेन सारख्या अनेक विचारवंतांचा अभ्यास केल्याने भारतात काय चाललं हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी साहू म्हणजे सावित्रीबाई हिला शिकविले. सावित्रीबाई शिकल्या त्यांच्यावर अध्यापन करण्याची जबाबदारी पडली. पुण्यात भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू झाली. त्या शाळेत एकूण ७ मुली होत्या..महाराष्ट्राच्या मुली साठी साहू शिक्षिका बनली. सावित्रीबाई ने नगर येथील शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेतले. फेरारी मॅडम यांच्या कडून अध्यापनासाठी पदवी मिळाली. सावित्रीबाई जेव्हा शाळेत शिकवू लागली त्यावेळी मनुवादी ब्राह्मण खवळले त्यांनी जोतीराव यांच्या वडिलांना सांगून धर्म बुडाला असा प्रचार केला. गोविंदराव यांनी जोतीराव व सावित्रीबाईला घरा बाहेर काढले. एका मुस्लिम मित्राने आपले घर जोतीराव व सावित्रीबाई यांना राहावयास दिले. मित्र उस्मान शेख याची बहीण फातिमा ही सावित्रीबाई यांच्याबरोबर शिकली.ती महात्मा फुले यांच्या इतर शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. सावित्रीबाईने आपल्या पतीच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून दिले. कर्मठ मनुवादी खवळले त्यांनी ह्या दाम्पत्याला त्रास देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. सावित्रीबाई फार विवेकी होत्या. एक सुसंवादी परिवार होता.तात्यासाहेब जोतीराव फुले यांनी शाळा सुरू करून त्या शाळांची जबाबदारी सावित्रीबाई हिने सांभाळली. एकूण १८ शाळा काढून तात्यासाहेबांनी भारतीय समाजावर खूप उपकार केले.बहुजनांना शिक्षण बंदी असताना शाळा काढून फार मोठे साहस ह्या परिवाराने केले. सावित्रीबाई निडरपने काम करीत राहिली. तिला मनुवादी लोकांचा त्रास झाला. ती शाळेत जात असताना तिच्या अंगावर कर्मठ मनुवाद्यानी शेणगोळे, दगड, पाणी फेकले. एका लुगड्यावर जाऊन ओले असताना लुगडे थोडे सुकल्यावर ती अध्यापन करीत होती. नेहमी हे घडत असल्याने सावित्रीबाई ला ताप आला. आपल्या धन्याला कसे सांगावे हे तिला समजत नव्हते. परंतू खूप ताप असल्याने साहू ने मोठ्या धाडसाने जोतीराव फुलेंना नवीन साडी आणून देण्याची विनंती केली. किती विनम्र होती साहू तिने त्रास अती झाल्यावर आपल्या धन्याला साडी मागितली.
शैक्षणिक काम चालू असताना सावित्रीबाई फुले यांना रस्त्याने जात असताना एका दृष्ट व्यक्तीने सावित्रीबाईंचा रस्ता अडविला.सावित्रीबाईने त्याला रस्ता अडविण्याचे कारण सांगितले. त्याने सांगितले की तू धर्म बुडविला. तुला शिकविण्याचा अधिकार नाही. सावित्री ने पुन्हा विनंती केली की तू बाजूला हो परंतु त्याने सावित्रीबाई ला अडविले. त्यावेळी सावित्रीबाई ने त्याच्या थोबाडीत मारून त्याला बाजूला केले. सावित्री धाडसी होत्या. कोणताही प्रसंगाला साहू तोंड देत होती.त्या कणखर असून विनम्र होत्या. जोतीराव व सावित्री यांना मारायला कपटी मनुवाद्यांनी दोन माणसे पाठविली होती. ती माणसे रानबा महार व धोंडिबा कुंभार ही बहुजनातील लोक होती. त्यांना सावित्रीबाई घाबरल्या नाहीत. त्या प्रसंगाने सावित्री मागे हटली नाही. तिने पतीला साथ दिली. आजची स्त्री असती तर तिने सांगितले असते अहो, लोक मारायला येतात. तुम्ही हे रिकामे काम करू नका. ज्याच्या साठी काम करतात ते लोक मारायला येतात. द्या सोडून हे काम.. असे म्हटले असते आजच्या स्त्रीने जी मनुवादी विचाराने पछाडली असेल अशा पत्नीने हे म्हटले असते. परंतु सावित्री जोतीरावाची प्राण होती. ती संकटाला घाबरली नाही. सारे जीवन जोतीरावांच्या सोबत समर्पित केले होते. माझ्या धन्याचे महान कार्य आपल्या शिरावर तिने घेतले होते. ब्राम्हण समाजातील काशीबाई जीव द्यायला जायला लागली तेव्हा तिला वाचविण्याचे काम सावित्रीने केले. काशीबाई हिला गर्भवती असताना तिला सुखद प्रसूती साठी स्वतःच्या घरी सोय करून दिली. आपली मुलगी समजून तिला वागविले. ज्योतिरावांना मूल बाळ होत नव्हते. त्यावेळी समाजातील लोक ज्योतिरावांना सांगत होते दुसरे लग्न करून घ्या. परंतु ज्योतिरावांनी ते मान्य केले नाही. सावित्रीने जोतीराव यांना दुसरे लग्न करून घेण्याचे सांगितले. एवढी उदारता सावित्रीच्या विचारात होती. ती आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. ती जर कर्मकांडात अडकली असती तर हे महान काम घडले नसते. समाजातील दृष्ट प्रथा विरुद्ध जोतिबाने कार्य केले त्या कामात सावित्रीबाई त्यांच्या सोबत होत्या. जोतीराव शरीर होते तर सावित्री त्या शरीरातील रुधिर होत्या. आपल्या घरात बाल प्रतिबंध गृह स्थापन करणारी सावित्री समाजमाता होती. सावित्रीबाई हिने अहोरात्र मेहनत घेऊन सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली.सत्यशोधक समाज महाराष्ट्रभर उभा केला. महात्मा फुले वारल्यानंतर त्यांचे प्रेत नेण्याच्या कामी चुलते तयार नव्हते तसेच दत्तक यशवंतला लोकांनी नकार दिला. तेव्हा खुद्द सावित्रीबाई टिटवे घेऊन निघाली. स्वतः सत्यशोधक असल्याचे कृतीतून दाखवून दिले. आज काही महिला सत्यशोधक विचाराने जगत आहेत. त्या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत. सतीची चाल बंद करण्यात जोतिबा सावित्रीने पुढाकार घेतला.मनुस्मृतीला खऱ्या अर्थाने सत्यशोधक विचाराने मात दिली. विधवा विवाह लावण्यात सावित्रीबाई चे योगदान विसरता येत नाही. सावित्रीने काव्यफुले नावाची साहित्य कृती लिहून साहित्यात आपली छाप तयार केली. बाल विवाह थांबविले. समाज सुधारण्यासाठी संपूर्ण जीवन सावित्रीने खर्च केले. आज जो शिक्षणात उच्चांक गाठला त्याचे श्रेय ज्योती सावित्रीला जातो. खूप महान काम ह्या परिवाराने केले त्याची तुलना शब्दात करता येणार नाही. सावित्रीबाई यांना त्रिवार अभिवादन.

एस. एच. भवरे
उपसंपादक
लेखन मंच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *