स्पर्धा परीक्षेचा पाया महाविद्यालयीन जीवनात*- संतोष वट्टमवार(पुणे) यांचे प्रतिपादन ———————————————- ●स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप ●१५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ●सीसीएमसी,रुसा,आयक्यूएसीचा उपक्रम
1 min read

स्पर्धा परीक्षेचा पाया महाविद्यालयीन जीवनात*- संतोष वट्टमवार(पुणे) यांचे प्रतिपादन ———————————————- ●स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप ●१५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग ●सीसीएमसी,रुसा,आयक्यूएसीचा उपक्रम

Loading

*स्पर्धा परीक्षेचा पाया महाविद्यालयीन जीवनात*-
संतोष वट्टमवार(पुणे) यांचे प्रतिपादन
———————————————-
●स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप
●१५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
●सीसीएमसी,रुसा,आयक्यूएसीचा उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथिल खानदेश शिक्षण मंडळ संचलित करिअर कौन्सिलिंग सेंटर अंतर्गत,राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष यांच्या सौजन्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे समारोप ३१ डिसेंबर २०२५ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी ११:३० ते दुपारी १:३० दरम्यान संपन्न झाले.
प्रस्तुत समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुणे येथिल गणित विषयाचे अभ्यासक संतोष वट्टमवार हे उपस्थित होते.यावेळी मंचावर करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, रुसा समन्वयक डॉ.मुकेश भोळे,इतिहास विभागाचे प्रमुख डॉ.धनंजय चौधरी,रेक्टर डॉ.अमित पाटील उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शक संतोष वट्टमवार यांचा परिचय गणित विषयाचे प्रमुख डॉ.नलिनी पाटील यांनी करून दिले. तद्नंतर डॉ.विजय तुंटे यांनी कार्यशाळेचा सविस्तरपणे आढावा घेतला, त्यानंतर
एक आठवडा चालणा-या मार्गदर्शन कार्यशाळेचे फीडबॅक आफ्रिन पठाण,रमा चव्हाण यांनी कार्यशाळेत आलेले अनुभव कथन केले आणि असे उपक्रम निरंतन व्हावेत अशी सर्वांच्या वतीने इच्छा व्यक्त केली.
मा.संतोष वट्टमवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सुरुवातीला साने गुरुजी यांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली, पूज्य गुरुजींच्या विचारांचा प्रभाव लहानपणापासूनच आहे हे मान्य केले. प्रताप महाविद्यालय व अमळनेर शहर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले महत्वाचे शहर आहे म्हणून इतिहासाचा आजचा परिप्रेक्ष्यात आढावा घेतला.
ही भूमी सत्याची भूमी आहे म्हणून विद्यार्थ्यांनी सजग राहावे कोणत्याही कोचिंगच्या मागे न धावता स्वयंप्रेरित काम करावे,परिस्थिती काहीही असेल त्या परिस्थितीला स्वतः बदलणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे मदत ज्ञान व माहितीच्या स्वरूपात घेणे आवश्यक आहे, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणजे पदवीला अध्यापन केलेले विषय हेच मूलतः समजून घेणे आवश्यक आहे. पदवीचे सर्व विद्याशाखेचे विषय हे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात म्हणून मिळालेल्या संसाधनाचा करिअरसाठी उपयोग आपण केला पाहिजे, ही सर्व परिस्थिती म्हणजे स्पर्धेचा पाया हा महाविद्यालयीन जीवनात निर्माण होत असतो. अलीकडील कोचिंग क्लासेस हे भरमसाठ प्रवेश फी घेऊन एका प्रकारे न परवडणारे आहे म्हणून संघ लोकसेवा आयोग,राज्य लोकसेवा आयोग या स्पर्धेची तयारी ही विशेष अशा ठिकाणी राहून करता येईल; परंतु इतर सरळ सेवा भरती, ग्रुप ए, ग्रुप बी,बँकिंग व तत्सम भरती परीक्षा ह्या आपल्याच महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकाच्या माध्यमातून आणि येथील पुस्तकांचा अभ्यास करून उत्तीर्ण होता येतात असे स्पष्टपणे सांगितले. त्याचप्रमाणे मा. वट्टमवार पुढे म्हणाले की, आपण आयुष्यात बी प्लॅन म्हणूनच स्पर्धेकडे पाहिले पाहिजे, या परीक्षेत अंत:करणापासून आले पाहिजे, आपणास ‘जे भेटले ते सिद्ध करण्याची’ क्षमता अंगी असली पाहिजे.गणित व संख्याशास्त्र या विषयाचे महत्त्व स्पर्धा परीक्षेत आहे म्हणून शून्य ते नऊ पर्यंतच्या अंकाची पाढे या स्पर्धा परीक्षेत महत्त्वाचे असतात. सूत्रांच्या पाठांतरामुळे गणिताचे फार मोठे नुकसान झाले आहे, समीकरण व चलाचे वापर न करता वेगवेगळ्या पद्धतीने गणिते सोडविता येतात आणि ते वैदिक पद्धतीने समजून घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
ही वैदिक पद्धत समजून घेणे महत्त्वाचे आहे, आपल्या दीड तासाच्या मार्गदर्शनात संतोष वट्टमवार यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
थोडक्यात,शिक्षक म्हणजे ज्ञान ज्ञानाचे कार्य करणारा एक महत्वाचा घटक आहे, गणित हा विषय सहज पद्धतीने वेगवेगळ्या वैदिक गणिताच्या पद्धतीतून सोडविता येतो यासाठी त्यांनी अनेक दाखले दिले.गणितातले वेगवेगळे महत्त्वाचे घटक सांगितले, संख्याशास्त्र हे सुद्धा स्पर्धा परीक्षेत कसे महत्त्वाचे आहे ? ते विशद केले.
जयेंद्र सरस्वती यांनी भारतीयासाठी वैदिक गणित पद्धतीचा कसा प्रयोग केला, गुणोत्तर प्रमाण हे कशा पद्धतीचे असते हे सरावाच्या माध्यमातून समजून सांगितले.गणिताच्या संकल्पना नव्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतात, त्यांनी शेवटी दिन दर्शिकाचा क्रम कसा असतो ? याची सहज, सोपी व शास्त्रशुद्ध पद्धतीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
प्रस्तुत सभेचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे म्हणाले की, आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून परिश्रमाच्या द्वारे यश संपादन करणे आवश्यक आहे म्हणून याकरिता गणित हा विषय समजून घेणेआणि त्यातील सोप्या पद्धती लक्षात घेणे, हे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे.
भविष्यात स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर शिस्त देखील पाळणे आवश्यक आहे, अशा स्वरूपाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर, डॉ.जे बी पाटील,डॉ.महेंद्र महाजन,डॉ.किरण गावित,प्रा.पुष्पा पाटील,डॉ.प्रियंका पाटील,प्रा.अमोल अहिरे,डॉ.आकाश गव्हाणे,डॉ.राखी घरटे,प्रा.सचिन आवटे,प्रा.दिलीप तडवी,प्रा.हिमांशू गोसावी,डॉ.हर्ष नेतकर आदी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यशाळा समारोप करिता सीसीएमसी विभागाचे पराग रवींद्र पाटील, अतुल धनगर,विशाल अहिरे, नंदूसिंग पाटील,दितेश चिंचोरे यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
याप्रसंगी साने गुरुजी सभागृह विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीने भरून गेले, विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद देऊन उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक प्रा.विजय साळुंखे यांनी केले तर आभार डॉ.बालाजी कांबळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *