नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती
![]()
नूतन माध्यमिक विद्यालय धमाणे येथे रंगला वार्षिक स्नेहसंमेलनाचा सांस्कृतिक उत्सव
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ; मान्यवरांची उपस्थिती
शिंदखेडा प्रतिनिधी :
नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, धमाणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमात समूह नृत्य, एकल व समूह गीत गायन, एकांकिका, नाटक, नकला आदी विविध सांस्कृतिक कला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण व दर्जेदार सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब आर. डी. पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बैसाणे साहेब, शिंदखेडा पंचायत समितीचे बीडीओ श्री. दादासो आर. एम. नेतनराव, माजी गटशिक्षणाधिकारी श्री. दादासो डी. एस. सोनवणे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसो जिजाबराव सोनवणे, माजी पंचायत समिती सभापती नाना दिवाण गिरासे, पंचायत समिती सदस्य दुल्लभ सखाराम सोनवणे, धमाणे ग्रामपंचायत सदस्य आबा मुंडे, प्रतिष्ठित नागरिक नानासो निळकंठ पाटील, आबासो केशव पाटील, बापुसो शामकांत यादवराव सोनवणे, ग्रामपंचायत सरपंच साखरबाई सोनवणे, सौजन्य माजी विद्यार्थी विशाल माळी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय गोरख पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व शिक्षकवृंद, सांस्कृतिक मंडळ, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम अत्यंत यशस्वी केला.

