जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे
1 min read

जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा* माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे

Loading

*जळगाव जिल्ह्यात लवकरच तक्रार निवारण सभा*
माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याला यश – तुळशीराम सोनवणे

जळगाव  प्रतिनिधी
जळगाव जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात लवकरच तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीने दिली आहे. जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समन्वय समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, माननीय जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी तक्रार निवारण सभा घेण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती समन्वयक तुळशीराम सोनवणे यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवाजेष्ठता, पदोन्नती, मान्यता, थकबाकी तसेच विविध प्रशासकीय स्वरूपाची अनेक प्रकरणे जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयात प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन संबंधितांना न्याय मिळावा, यासाठी तक्रार निवारण सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या सभेमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास समन्वय समितीने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्यांचे प्रश्न किंवा प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या सुवाच्य अक्षरात दोन प्रतींमध्ये लिहून समक्ष किंवा पोस्टाने तातडीने खालील पत्त्यावर पाठवाव्यात, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सदर तक्रार निवारण सभेस माध्यमिक शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व संघटनांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत.
समस्या पाठविण्याचा पत्ता :
(१) श्री. प्र. ह. दलाल (सर),
कन्हैयालाल प्लॉट, जामनेर रोड, भुसावळ.
मो. ७६२०१३२१७५
(२) श्री. तुळशीराम सोनवणे,
मो. ७७०९७७२७८०८
समन्वयक, शिक्षक–शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्हा.
तक्रार निवारण सभेचा लाभ जास्तीत जास्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन समन्वय समिती अध्यक्ष गिरीश नेमाडे ,पी.ए.पाटील, सुनिता खडके, सुनीता पाटील, गोविंदा पाटील, एस एस अहिरे, सौ अश्विनी पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *